Bank Holidays : डिसेंबर महिन्याची आणि 2024 ची येत्या काही दिवसांनी सांगता होणार आहे. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पिकनिक डेस्टिनेशन ला भेटी देत आहेत. गोव्यासारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.
दरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडिया ने जानेवारी 2025 मध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत मोठी माहिती दिली आहे. जानेवारी 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केलेली आहे.
यामुळे जर तुम्हाला ही जानेवारी महिन्यात बँकेत जाऊन काही कामे करायचे असतील तर आरबीआयच्या या सुट्ट्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण जानेवारी महिन्याच्या Bank Holiday ची संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जानेवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील याची आपण माहिती पाहणार आहोत.
जानेवारी 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
1 जानेवारी- नववर्ष निमित्ताने देशातील बहुतांश राज्यात बँका बंद राहतील.
5 जानेवारी- रविवार असल्याने देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
11 जानेवारी- दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्वच बँका बंद राहतील.
12 जानेवारी- रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने देशातील सर्व बँका बंद राहतील.
14 जानेवारी- मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद राहणार आहेत.
15 जानेवारी – तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआय ने दिली आहे.
16 जानेवारी – उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद राहणार आहेत.
19 जानेवारी – रविवार / आठवडी सुट्टी असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
22 जानेवारी- इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा राहणार आहे.
23 जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्ताने मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्लीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
25 जानेवारी- चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण साजरा होणार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद असतील.
30 जानेवारी – सोनम लोसर/ सिक्किममध्ये बँकाना रजा राहणार आहे.