IDBI FD Scheme : IDBI बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आयडीबीआय बँकेत ज्या लोकांना एफडी करायची आहे अशा लोकांसाठी आयडीबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून एक विशेष FD स्कीम लॉन्च केली आहे. फिक्स डिपॉझिट (एफडी) योजनेत बदल करण्यात आले आहेत. बँकेने नवीन कालावधी आणि जास्त व्याजासह नवीन एफडी योजना सुरू केली आहे.
तसेच, IDBI बँकेने त्यांच्या जुन्या विशेष FD मध्ये गुंतवणुकीची मुदत सुद्धा वाढवली आहे. खरंतर अनेक गुंतवणूकदारांनी आयडीबीआय बँकेत एफडी केली आहे. तसेच अनेक जण नजीकच्या भविष्यात आयडीबीआय बँकेत एफडी करण्याच्या तयारीत आहेत.
जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात आयडीबीआय बँकेत FD करण्याच्या तयारीत असाल तर बँकेचा हा निर्णय नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. आता आपण आयडीबीआय बँकेने जाहीर केलेल्या नव्या विशेष FD योजनेची तसेच आधीच्या विशेष FD योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मुदत किती दिवस वाढवली आहे ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आधीच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्याची मुदत किती वाढवली?
आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून आधीच तीनशे दिवस, 375 दिवस, 444 दिवस आणि 700 दिवसाची विशेष एफडी योजना सुरू करण्यात आली आहे. या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना अनुक्रमे 7.05 %, 7.25%, 7.35% अन 7.20% दराने परतावा दिला जातोय.
तसेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अनुक्रमे 7.55%, 7.75 टक्के, 7.85% आणि 7.70% दराने परतावा दिला जातोय. दरम्यान, आता या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या विशेष एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत होती.
मात्र ही मुदत आता तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आता 31 मार्च 2025 पर्यंत या विशेष FD योजनांमध्ये ग्राहकांना गुंतवणूक करता येणार आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना या एफडी योजनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
555 दिवसांची नवीन वाली उत्सव कॉल करण्यायोग्य FD
IDBI बँकेने 23 डिसेंबर 2024 पासून 555 दिवसांच्या नवीन कालावधीसह उत्सव FD लाँच केली आहे. ही योजना १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वैध राहणार आहे. म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कॉल करण्यायोग्य FD मध्ये पैसे वेळेपूर्वी काढण्याची परवानगी नसते.
बँकेने जाहीर केलेल्या या नव्या 555 दिवसांच्या विशेष एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना 7.40% दराने परतावा दिला जाणार आहे तसेच जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.90% दराने परतावा मिळणार आहे.