मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय! ‘या’ मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे

Tejas B Shelar
Published:

Ladki Bahin Yojana News : गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हफ्त्याची प्रतीक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत सहा महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक अकाउंट मध्ये वर्ग करण्यात आले आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

14 जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे आणि याच सणाचे औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय. असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे.

2100 रुपयाचा लाभ कधीपासून मिळणार ?

लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती. महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी 2100 रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही महायुतीने दिली होती.

त्यामुळे आता एक विषय रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येतोय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिले आहेत.

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत सरकारकडून मिळत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe