Pune To Amravati And Mumbai To Amravati Vande Bharat Railway : पुणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे सर्वाधिक चर्चेच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भातील. वंदे भारत ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली.
सध्या महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यातुन आणि केंद्रशासित प्रदेशातुन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि पुण्याला एकापेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. असे असतानाही आता मुंबई आणि पुण्याला आणखी एक-एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे.
मुंबई ते अमरावती आणि पुणे ते अमरावती दरम्यान ही गाडी सुरू होणार असून याचे संभाव्य वेळापत्रक देखील प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे. या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस मुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेने जलद गतीने मुंबई आणि पुण्याला येता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे आता रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुणे ते अमरावती आणि मुंबई ते अमरावती हा प्रवास वंदे भारत ट्रेन ने करता येणे शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या दोन्ही गाड्या जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत.
तसेच या दोन्ही गाड्यांना उत्तर महाराष्ट्रातील या दोन्ही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही गाड्यांचे संभाव्य वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
मुंबई अमरावती वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार?
मीडिया रिपोर्टनुसार, ही वंदे भारत ट्रेन अमरावती रेल्वे स्थानकावरून पहाटे तीन वाजून 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी सकाळी 11 वाजून दहा मिनिटांनी मुंबईला पोहोचणार आहे.
ही ट्रेन अमरावती येथून सुटल्यानंतर अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल आणि मुंबईला येणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी 15 वाजून 55 मिनिटांनी मुंबई येथून सुटणार आहे आणि 23 वाजून पंचवीस मिनिटांनी अमरावती रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.
पुणे अमरावती वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार?
मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी अमरावती वरून पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे. अमरावती वरून सुटल्यानंतर ही गाडी अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड या रेल्वे स्थानकावर थांबा घेत दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी 15:40 ला पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि रात्री 23:45 ला अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.