…….तर 6 महिन्यांनी तुमचे रेशन कार्ड रद्द होणार ! रेशन कार्ड रद्द झाल्यानंतर ते पुन्हा कसे सुरु करायचे? वाचा…

रेशन कार्ड संदर्भात शासनाने काही नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे पालन झाले नाही तर रेशन कार्ड रद्द देखील होऊ शकते. नियमानुसार जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशन घेत नाहीत त्यांचे रेशन कार्ड हे रद्द केले जाऊ शकते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (PDS) नियमानुसार, किमान सहा महिने रेशन कार्डवर धान्य न घेतल्यास कार्ड रद्द केले जाऊ शकते.

Published on -

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. शासन रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदूळ पुरवते. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हे धान्य कोरोना काळापासून रेशन कार्डधारकांना मोफत वितरित केले जात आहे.

यामुळे देशभरातील कोट्यावधी कुटुंबांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होतोय. पण रेशन कार्ड संदर्भात शासनाने काही नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे पालन झाले नाही तर रेशन कार्ड रद्द देखील होऊ शकते.

नियमानुसार जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशन घेत नाहीत त्यांचे रेशन कार्ड हे रद्द केले जाऊ शकते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या (PDS) नियमानुसार, किमान सहा महिने रेशन कार्डवर धान्य न घेतल्यास कार्ड रद्द केले जाऊ शकते.

अशा परिस्थिती, जर तुमचं कार्ड रद्द झालं असेल, तर तुम्ही काय करायला हवे? रद्द झालेले रेशन कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्ह कसं करायचं हेचं आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

रद्द झालेले रेशन कार्ड पुन्हा कसे सुरु करणार

जर तुम्ही सलग सहा महिने स्वस्त रेशन धान्याचा लाभ घेतलेला नसेल तर तुमचे कार्ड रद्द केले जाऊ शकते. जर तुमचे रेशन कार्ड रद्द झाले असेल आणि तुम्हाला ते परत सुरु करायचे असेल तर यासाठी तुम्हाला राज्याच्या अधिकृत AePDS पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.

यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या किंवा सेंट्रल AePDS पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे मग रेशन कार्ड करेक्शन पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पोर्टलवर “Ration Card Correction” पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

मग रेशन कार्ड डिटेल भरा, यात रेशन कार्ड नंबर आणि संबंधित तपशील भरून सबमिट करा. चुका दुरुस्त करा. जर कार्डमध्ये काही चुकीची माहिती असेल, तर ती पोर्टलवरून दुरुस्त करा. मग PDS कार्यालयात अर्थातच पुरवठा विभागाच्या कार्यालयात अर्ज सबमिट करा.

अर्ज पूर्ण केल्यानंतर तो सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) कार्यालयात सबमिट करावाच लागतो. इथे अर्ज सादर झाल्यानंतर तो अर्ज मंजूर झाला की कार्ड अ‍ॅक्टिव्ह होईल. अशा तऱ्हेने तुम्ही तुमचे रद्द झालेले रेशन कार्ड पुन्हा ऍक्टिव्ह करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News