एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘

Sushant Kulkarni
Published:

SBI Small Cap Fund:- गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढल्याचे दिसून येत असून म्युच्युअल फंड योजनेमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला जात आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक वाढताना आपल्याला दिसून येत आहे. म्युच्युअल फंड योजना या बाजाराशी निगडित असल्यामुळे काही प्रमाणामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत यामध्ये जोखीम असते. परंतु परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मात्र या योजना फायद्याच्या ठरतात. अगदी या अनुषंगाने जर आपण एसबीआय म्युच्युअल फंडाच्या स्मॉल कॅप फंड या योजनेबद्दल बघितले तर 9 सप्टेंबर 2009 रोजी ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती व तिला आता जवळपास 14 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

तेव्हापासून आजपर्यंत जर मिळणारा परतावा बघितला तर तो खूप चांगल्या पद्धतीने मिळाला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या गुंतवणूकदाराने जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा जर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली असती तर ती रक्कम आता 49.44 लाख रुपये झाली असती व 14 वर्षात मुद्दल म्हणजेच मूळ गुंतवणूक ही पाच हजार रुपये प्रतिमहिना 8.40 लाख रुपयांची झाली असती.

एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडात एसआयपीद्वारे मिळाला 49.44 लाख रुपयांचा परतावा

या योजनेमध्ये एसआयपीच्या माध्यमातून ज्यांनी 8 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली त्यांना या योजनेतून तब्बल 49.44 लाख रुपयांचा परतावा मिळाला. म्हणजेच जमा रकमेपेक्षा थेट 41.4 लाख रुपये अधिक मिळाले. एसबीआयच्या या स्मॉल कॅप फंडाने एसआयपीद्वारे दिलेल्या गुंतवणुकीवर साधारणपणे 22.85 टक्क्यांचा सीएजीआरवर परतावा दिला आहे.

तसेच एखाद्या गुंतवणूकदाराने जर न्यू फंड ऑफर दरम्यान या योजनेत एकरकमी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे आता एक कोटी 37 लाख रुपये जमा झाले असते. एसबीआयच्या या स्मॉल कॅप फंडाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता 20,000 कोटी रुपयांवर पोहोचली असून एसबीआय स्मॉल कॅप फंड हा सर्वात जुन्या फंडांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत 65 टक्के मालमत्ता स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe