२१ जानेवारी २०२५ मुंबई : सध्याचा जमानाच क्विक कॉमर्सचा आहे. २०२४ वर्षातील आकडेवारी पाहिली तर ते सहज अधोरेखित होते.ब्लिंकइट, झेप्टो,इन्स्टामार्ट यासारख्या सेवांच्या माध्यमातून भारतीयांनी कोणकोणत्या गोष्टी मागवल्या याची आकडेवारीच समोर आली आहे.विशेष म्हणजे भारतीयांनी सर्वाधिक मागवलेल्या गोष्टींची यादी अगदीच थक्क करणारी आहे.
आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर मुंबईकरांनी ब्लिंकइटवरून वर्षभरात १७.६ लाख कंडोम मागवले आहेत.बंगळुरूमध्ये झेप्टोवरून वर्षभरात
मागवलेल्या कंडोमची संख्या ४ लाख इतकी आहे.इन्स्टामार्टवर ऑर्डर करण्यात आलेल्या १४० ऑर्डर्समागे प्रत्येक ऑर्डर ही सेक्स संदर्भातील वस्तू आहे.
बंगळुरूमधील लोकांनी इन्स्टामार्टवर कंडोमवर सर्वाधिक पैसे खर्च केला.टूथब्रश, मॅगी ब्लिंकइटवर भारतीयांनी १.७५ कोटी मॅगीची पाकिटे मागवली आहेत. तर झेप्टोवरून भारतीयांनी वर्षभरात लेस मॅजिक मसाला या फ्लेवरच्या वेफर्सची तब्बल १२ लाख पाकिटे मागवली.
त्याचप्रमाणे स्विगी इन्स्टामार्टवरून भारतीयांनी तब्बल २.७ लाख टूथब्रश मागवले आहेत.कमी वेळेत ग्राहकांना मिळते वस्तू क्विक कॉमर्समध्ये केवळ किराणा माल नाही तर मोबाईल फोन, लॅपटॉप, औषधे आणि फॅशनेबल कपडेही मागवल्याचे दिसून आले आहे.
झेप्टोने हा विक्रम आपल्या नावावर करताना अवघ्या २५ सेकंदांमध्ये मागवलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे. तर इन्स्टामार्टने कोच्चीमध्ये ८९ सेकंदांमध्ये डिलिव्हरी केली.ही डिलिव्हरी त्यांनी १८० मीटर अंतरावर केली.
४५ लाखांच्या झाडूंची खरेदी
या आकडेवारी मधील काही गोष्टी खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत.उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर दिवाळीच्या काळात लक्ष्मी म्हणून नवीन झाडू विकत घेण्याची परंपरा आहे.त्याचा परिणाम या क्विक कॉमर्समध्ये दिसून आला.दिवाळीत भारतीयांनी या तीन प्लॅटफॉर्मवरून झाडू विकत घेण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपये खर्च केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे.
सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्सची जोरदार विक्री
सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्नॅक्स या सर्वाधिक मागवलेल्या गोष्टीपैकी आहेत.कोकाकोलाचे १.८५ कोटी कॅन्स मागवले आहेत, तर ८४ लाख थम्बसअपच्या बाटल्या या माध्यमातून मागवण्यात आल्या आहेत. १४.६ लाख माझाच्या बाटल्या क्विक कॉमर्सवरून भारतीयांनी मागवल्या आहे.