Property Tips:- घर किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीची खरेदी हा एक बनशील आणि तितकेच गुंतागुंतीची प्रक्रिया असून ज्यात विविध कागदपत्रांचा समावेश असतो. जर या कागदपत्रांची योग्य पद्धतीने तपासणी केली नाही तर तुम्हाला भविष्यात प्रॉपर्टीवर मालकी हक्क मिळवण्यास अडचणी येऊ शकतात. यासाठी, काही महत्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रांची योग्य काळजी घेऊन ते तपासणे गरजेचे असते.
प्रॉपर्टी खरेदीत सेल डीड महत्वाचे
प्रॉपर्टी खरेदी करताना सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे विक्री करार किंवा खरेदी दस्त (Sale Deed) होय.या कागदपत्रात प्रॉपर्टीच्या विक्रीची सर्व माहिती दिली जाते आणि विक्रेता व खरेदीदार यांच्यातील झालेल्या करारा संबंधी माहिती असते. या कागदपत्राशिवाय तुमच्याकडे प्रॉपर्टीचे कायदेशीर हक्क प्रस्थापित होऊ शकत नाहीत. म्हणून, या कागदपत्राची नोंद आणि योग्य पद्धतीने पडताळणी करणे आवश्यक आहे.
या गोष्टींची काटेकोर करा तपासणी
तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असताना, विक्रेत्याचे आणि कागदपत्रांचे तपशील नक्की तपासा. प्रॉपर्टीवर कुठलेही कर्ज, वाद किंवा दुसरे कायदेशीर बंधन नाही याची खात्री करा. यामुळे भविष्यकाळात तुम्हाला प्रॉपर्टीवर मालकी हक्क मिळवण्यात अडचणी येणार नाहीत. प्रॉपर्टी खरेदी करताना, जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत किंवा इतर कायदेशीर अडचण तर नाही ना याची खात्री करून घ्या.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, प्रॉपर्टीचे कागदपत्रे प्रमाणित असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात त्या प्रॉपर्टीवरील तुमचा मालकी हक्क कायदेशीर आणि सुरक्षित ठरेल. हे कागदपत्र तपासून योग्य मार्गाने अंतिम निर्णय घ्या आणि त्यावर सही करणाऱ्यांची खात्री करा.
या सर्व बाबींची काळजी घेतल्यास, तुम्हाला प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. प्रॉपर्टी खरेदी करताना योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्यास, तुम्ही सुरक्षितपणे त्या प्रॉपर्टीवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकता.