Home Loan घेताय का ? सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या देशातील टॉप 5 बँका पहा…

तुम्ही आगामी काळात घर घेण्याच्या तयारीत असाल पण तुमच्याकडे घर खरेदीसाठी लाखो रुपयांची बचत नसेल तर आणि म्हणून तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घेणे तुम्हाला परवडेल याचाचं आढावा आज आपण घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Home Loan : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरेतर, गृह कर्ज घेण्याअगोदर वेगवेगळ्या बँकांच्या, वित्तीय संस्थांच्या व्याज दराची तुलना करणे आवश्यक आहे.

खरे तर गृह कर्जावरील व्याजदर आपला क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम आणि आपला व्यवसाय यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. मात्र असे असले तरी देशातील प्रमुख बँकांकडून सध्या काय व्याजदराने गृह कर्ज दिले जात आहे याची माहिती असल्यास आपल्याला तुलना करणे सोपे होते.

मंडळी, आपल पण एक स्वतःचं, हक्काचं घर असावं असं स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. अनेकांचे घराचे स्वप्न या आधीच पूर्ण देखील झाले असेल. तर काही लोक अजूनही या स्वप्नासाठी झगडत असतील.

दरम्यान जर तुम्ही आगामी काळात घर घेण्याच्या तयारीत असाल पण तुमच्याकडे घर खरेदीसाठी लाखो रुपयांची बचत नसेल तर आणि म्हणून तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घेणे तुम्हाला परवडेल याचाचं आढावा आज आपण घेणार आहोत. आज आपण देशातील सर्वच प्रमुख बँकांच्या गृह कर्जाच्या व्याजदराची माहिती जाणून घेणार आहोत.

देशातील प्रमुख बँकांचे गृह कर्जावरील व्याजदर

UCO बँक : किमान 8.30% व्याज दरावर गृह कर्ज देते.

युनियन बँक ऑफ इंडिया : 8.30% ते 10.90% व्याजदरावर कर्ज प्रदान करते.

बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.35% ते 11.10% दराने गृह कर्ज देत आहे.

बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा चे गृह कर्जाचे व्याज दर हे 8.40% ते 10.65% यादरम्यान आहेत.

पंजाब नॅशनल बँके : पंजाब नॅशनल बँकेचे व्याज दर 8.40% ते 10.25% यादरम्यान आहेत.

कॅनरा बँके : कॅनरा बँकेचे व्याज दर 8.40% ते 11.25% यादरम्यान आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे व्याजदर 8.50% ते 9.85% यादरम्यान आहेत.

सिटी युनियन बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना 8.25% ते 10.50% व्याजदरात कर्ज देते.
दक्षिण भारतीय बँक आणि एचएसबीसी बँक : या दोन्ही बँकांचे गृह कर्जाचे व्याजदर 8.50% पासून सुरू होतात.

कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक : या दोन्ही खाजगी बँकांचे व्याजदर 8.75% पासून सुरू होतात.

अ‍ॅक्सिस बँके : ॲक्सिस बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर 8.75% ते 13.30% यादरम्यान आहेत.

आरबीएल बँक : आरबीएल बँकेचे गृह कर्जासाठी चे व्याजदर 9% पासून सुरू होतात.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि बजाज हाऊसिंग फायनान्स : या दोघांचे व्याजदर 8.50 % पासून सुरू होतो.

टाटा कॅपिटल : टाटा कॅपिटल या हाउसिंग फायनान्स कंपनीचे गृह कर्जासाठी चे व्याजदर 8.75% पासून सुरू होतात.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स : पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनी 8.50% ते जास्तीत जास्त 14.50% यादरम्यान गृह कर्ज ऑफर करते.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स : जीआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे गृह कर्जाचे व्याजदर 8.80 टक्क्यांपासून सुरू होतात.

एसएमएफजी इंडिया होम फायनान्स : या कंपनीचे गृह कर्जासाठी चे व्याजदर 10 टक्क्यांपासून सुरू होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe