Samsung Galaxy S25 सीरीज लाँच झाल्यानंतर Galaxy S24 सीरीज स्वस्त ! ‘या’ ठिकाणी मिळतोय 23,000 चा डिस्काउंट

काही दिवसांच्या काळातच या स्मार्टफोनला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आतापर्यंत अनेकांनी हा स्मार्टफोन खरेदी केला आहे. दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस25 सिरीज लॉन्च झाल्यानंतर दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनीने गेल्या वर्षीच्या गॅलेक्सी एस 24 ची किंमत कमी केली आहे.

Published on -

Samsung Galaxy S24 Price : दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने या महिन्यात भारतासह जागतिक बाजारात सॅमसंग एस 25 सीरीजची ओळख करुन दिली. हा फोन लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांच्या काळातच या स्मार्टफोनला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

आतापर्यंत अनेकांनी हा स्मार्टफोन खरेदी केला आहे. दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस25 सिरीज लॉन्च झाल्यानंतर दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनीने गेल्या वर्षीच्या गॅलेक्सी एस 24 ची किंमत कमी केली आहे. आता त्याची किंमत 54,999 रुपये इतकी झाली आहे.

या स्मार्टफोनवर ग्राहकांना तब्बल 23 हजार रुपयांची बचत करता येणे शक्य झाले आहे. ऑनलाइन शॉपिंग साईटवर हा स्मार्टफोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा फारच कमी किमतीत उपलब्ध होतोय. अशा परिस्थितीत आता आपण हा स्मार्टफोन कोणत्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

सॅमसंग गॅलेक्सी एस 24 ची किंमत

कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस 24 लाँच करतांना सुरुवातीला याचे दोन व्हेरिएंट लॉन्च केलेत. 8 जीबी+256 जीबी अन 8 जीबी+512 जीबी हे व्हेरिएंट सुरुवातीला लॉन्च करण्यात आले. यातील 8 जीबी+256 जीबी व्हेरिएंटची लाँचिंग किंमत 79,999 रुपये होती आणि 8 जीबी+512 जीबीची किंमत 89,999 रुपये होती.

त्याच वेळी, नंतर आलेल्या 8 जीबी +128 जीबी व्हेरियंटची किंमत 74,999 रुपये इतकी होती. पण आता बाजारात सॅमसंग गॅलेक्सी एस 25 ची एन्ट्री झाली आहे आणि यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एस 24 चे तिन्ही व्हेरिएंट स्वस्त करण्यात आले आहेत.

हे तिन्ही प्रकार सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत अन जिथे 8 जीबी +128 जीबी, 8 जीबी+256 जीबी आणि 8 जीबी+512 जीबी या तिन्ही वेरिएंटच्या किमती अनुक्रमे 64 हजार 999, 70 हजार 999 आणि 82 हजार 999 अशा आहेत.

या व्यतिरिक्त, खरेदीदारांना एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे 10,000 रुपयांच्या इन्स्टंट सवलतीचा सुद्धा येथे फायदा मिळतोय. या ऑफर अंतर्गत खरेदीदारांना गॅलेक्सी एस 24 चे बेस मॉडेल कमीत कमी 54,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

म्हणजेच या ठिकाणी ग्राहकांना लॉन्चिंग प्राईस पेक्षा 20 हजार रुपये स्वस्तात हा फोन खरेदी करता येणार आहे. तसेच, गॅलेक्सी एस 24 चे 8 जीबी+128 जीबी प्रकार फ्लिपकार्टवर 56,702 रुपयात सूचीबद्ध केले गेले आहे.

त्याच वेळी, समान प्रकार Amazon मेझॉनवर 53,999 रुपये (बँक ऑफरनंतर 51,999 रुपये) मध्ये सूचीबद्ध आहे. या किंमती कोणत्याही अतिरिक्त ऑफर किंवा सूटशिवाय आहेत. त्याच वेळी, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे अतिरिक्त बचत केली जाऊ शकते.

एकंदरीत सॅमसंग गॅलेक्सी एस 24 चे बेस मॉडेल अमेझॉन या शॉपिंग साइटवर सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. मात्र यासाठी ग्राहकांना ऑफरचा लाभ घ्यावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News