Cibil Score | ‘या’ 6 सोप्या गोष्टी फॉलो करा अन खराब झालेला सिबिल स्कोर थेट 800 वर घेऊन जा !

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. हा स्कोर जर साडेसातशेच्या वर असेल तर अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर हा चांगला समजला जातो. म्हणजेच हा व्यक्ती त्याचे ईएमआय वेळेवर भरत आहे, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत आहे, त्याच्यावर कोणतेही कर्ज थकीत नाही, त्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे असे यातून स्पष्ट होते.

Published on -

Cibil Score News : तुम्ही कधी बँकेत कर्जासाठी इन्क्वायरी केली असेल? कधी कर्ज घेतले असेल किंवा घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही सिबिल हा शब्द नक्कीच ऐकला असेल. खरेतर, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असते. व्यक्तीच्या सिबिल स्कोर च्या आधारावरच बँकेकडून तसेच वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर होते.

अलीकडे कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेतले जाते. साधा मोबाईलही घ्यायचा असला तरी देखील कर्ज घेतले जाते आणि बँका देखील सहजतेने कर्ज देतात. मात्र मोबाईल, लॅपटॉप, फ्रीज असो किंवा घर, गाडी असो कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घ्यायचे असेल तर व्यक्तीचा सिबिल स्कोर तपासला जातो.

किंबहुना वैयक्तिक गरजेसाठी वैयक्तिक कर्ज जरी घ्यायचे असेल तरीसुद्धा बँक सिबिल स्कोर चेक करते आणि त्यानंतरच कर्ज द्यायचे की नाही हे ठरते. सिबिल स्कोर हा कोणत्याही व्यक्तीच्या कर्जाची हिस्ट्री दर्शवत असतो. व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही, आत्तापर्यंत त्याने आपल्या कर्जाची हप्ते वेळेवर भरली आहेत की नाही, क्रेडिट कार्डची बिले तो व्यवस्थित भरतोय का? या सर्व गोष्टींचा अंदाज सिबिल स्कोर वरून बांधता येतो.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. हा स्कोर जर साडेसातशेच्या वर असेल तर अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर हा चांगला समजला जातो. म्हणजेच हा व्यक्ती त्याचे ईएमआय वेळेवर भरत आहे, क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरत आहे, त्याच्यावर कोणतेही कर्ज थकीत नाही, त्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे असे यातून स्पष्ट होते.

दरम्यान ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो म्हणजे चांगला असतो अशा लोकांना सहजतेने कर्ज मंजूर होते. या लोकांकडून बँका कमी व्याजदर वसूल करतात तसेच अशा लोकांना अधिक रकमेचे कर्ज सुद्धा मंजूर होते. मात्र ज्या लोकांचा हा स्कोर डाउन असतो अशा लोकांना कर्ज मिळवण्यात अडचणी येतात. त्यांना अधिकचे व्याज द्यावे लागते, कित्येकदा तर सिबिल स्कोर खराब असल्याच्या कारणांनी कर्ज नामंजूर सुद्धा होते.

मग आता तुमच्या मनात सिबिल स्कोर कसा सुधारायचा हा प्रश्न आला असेल नाही का? सिबिल स्कोर एवढा महत्त्वाचा आहे मग तो चांगला असणे आवश्यक आहेच. पण काही कारणाने जर तुमचा सिबिल खराब झाला असेल तर चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला 6 अशा भन्नाट टिप्स सांगणार आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पुन्हा एकदा चांगला करू शकता.

या 6 गोष्टींची काळजी घ्या आणि सिबिल स्कोर सुधारा

तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वारंवार तपासून पहा. यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर नेमका किती आहे हे समजतं. तसेच तुमच्या नावाने कोणी कर्ज घेऊन ते कर्ज थकीत तर करत नाही ना हे देखील तुम्हाला यातून समजतं.

तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल अन तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाबाबत चौकशी करत असाल तर असं करणं थांबवा. यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर डाउन होऊ शकतो. तसेच बँकेकडून तुम्हाला जेवढे कर्ज हवे आहे तेवढेच घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण यामुळे तुमचे कर्ज थकू शकते.

आधीच जर एखादे कर्ज तुमच्यावर असेल तर ते कर्ज आधी निल करा आणि नंतर दुसरे कर्ज घ्या.
तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्या क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर याचा सिबिल वर सर्वात जास्त परिणाम होतो.

तुम्ही जर EMI वर मोबाईल फ्रिज टीव्ही यांसारख्या वस्तू घेतल्या असतील, बाईक घेतली असेल तर अशा वस्तूंवरील EMI दर महिन्याला काळजीपूर्वक भरा.

तुमच्या चालू क्रेडिट कार्डवर चुकून सुद्धा कर्ज घेण्याचा विचार करू नका. क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळा. तसेच जर क्रेडिट कार्ड असेल तर ते बंद करण्याचा विचार करू नका. तुम्ही जर तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद केले तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने काढलेल्या कर्जासाठी जामीनदार असाल आणि त्या व्यक्तीने जर कर्ज भरले नाही, कर्जाचे हप्ते थकवले तर तुमचा सिबिल सुद्धा डाऊन होतो. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार होताना याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!