टाटा ‘या’ महिन्यात लॉन्च करणार Tata Harrier EV ! फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत किती ? पहा…

टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये ईव्हीची प्रभावी श्रेणी दर्शविली, ज्यात अत्याधुनिक अन बहुचर्चित टाटा हॅरियर EV चा सुद्धा समावेश होता. कंपनी आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी ही कार या चालू वर्षात बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा हॅरियर ईव्ही ही ब्रँडकडून सादर केली जाणारी एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Tata Harrier EV Price : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे टाटा कंपनी लवकरच आपली एक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात लॉन्च करणार आहे. खरे तर भारतीय मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलीये. हीच बाब लक्षात घेऊन आता विविध दिग्गज ऑटो कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक वाहन प्रोड्यूस करत आहेत.

भारतीय कार मार्केट मधील इलेक्ट्रिक सेगमेंटचा विचार केला असता सध्या टाटा कंपनीचा यात बोलबाला आहे. कंपनीचे अनेक इलेक्ट्रिक वेहिकल्स सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दरम्यान, टाटा मोटर्सने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये ईव्हीची प्रभावी श्रेणी दर्शविली, ज्यात अत्याधुनिक अन बहुचर्चित टाटा हॅरियर EV चा सुद्धा समावेश होता.

कंपनी आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग बनवण्यासाठी ही कार या चालू वर्षात बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटा हॅरियर ईव्ही ही ब्रँडकडून सादर केली जाणारी एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे. ही कार प्रगत तंत्रज्ञानाचे एक उत्तम मिश्रण असेल.

या SUV मध्ये विस्तृत श्रेणीसह लोकप्रिय ICE हॅरियरचे आकर्षक लुक अन आधुनिक डिझाइन राहणार आहे. या गाडीमध्ये आधुनिक इव्ही टेक्नॉलॉजी राहणार आहे. या गाडीमध्ये ICE मॉडेलचे अनेक डिझाईन एलिमेंट असतील अन गाडीचे डायमेन्शन देखील ICE मॉडेलसारखे राहणार आहेत. Tata Harrier EV चा लुक कमी-अधिक प्रमाणात ICE व्हेरियंटशी मिळतीजुळता असेल.

तथापि, कारला EV बॅज मिळाला आहे आणि इलेक्ट्रिक कारला अनुकूल होण्यासाठी तिच्या पुढील आणि मागील बंपरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. यासोबतच Tata Harrier EV मध्ये नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स देखील दिसत आहेत. आता, Tata Harrier EV ची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

कधी लाँच होणार नवीन कार?

Tata Harrier EV कधीपर्यंत लॉन्च होणार याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. ऑफिशियली ही गाडी कधी लॉन्च होणार हे सांगितले गेले नसले तरी देखील मार्च 2025 अखेरपर्यंत ही गाडी भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

गाडीचे इंटेरियर कसे असणार?

सामान्य ICE मॉडेलची अनेक वैशिष्ट्ये टाटा हॅरियर EV च्या केबिनमध्ये देखील दिसतात. नवीन Tata Harrier EV मध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे आणि यासोबतच कारचे HVAC कंट्रोल्स देखील टच आधारित आहेत. हॅरियर EV मध्ये वाहन ते लोड आणि वाहन ते वाहन चार्जिंग क्षमता देखील प्रदान करण्यात आली आहे. सोप्या भाषेत, Harrier EV सह तुम्ही इतर वाहने आणि घरगुती उपकरणे सुद्धा चार्ज करू शकता.

कसे राहणार फिचर्स?

Tata Harrier EV कंपनीच्या Gen 2 Acti.EV () आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे. ही कार लँड रोव्हरच्या ओमेगा प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे जी पूर्णपणे इलेक्ट्रिक कारसाठी तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्ममुळे कारला ऑल व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेन देण्यात आली आहे. ऑटो एक्सपोमध्ये ही कार मॅट-ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आली आहे.

कंपनीने Harrier EV च्या या प्रकाराला Stealth Mode असे नाव दिले आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक, व्हेंटिलेशनसह पॉवर फ्रंट सीट्स, 12.3-इंचाचा इन्फोटेनमेंट सेटअप, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, एक JBL प्रीमियम साउंड सिस्टम, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जिंग आणि असे अनेक अधिक प्रगत वैशिष्ट्ये असतील.

याव्यतिरिक्त, टाटा हॅरियर ईव्ही ADAS प्रणाली, ड्रायव्हर डोझ-ऑफ वैशिष्ट्य, हिल डिसेंट कंट्रोल, सात एअरबॅग्ज, 360-डिग्री एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण इत्यादी सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.

कशी असणार बॅटरी?

या गाडीमध्ये बॅटरी पॅक कोणता असेल? याची माहिती देण्यात आलेली नाही पण रिपोर्टनुसार यात 60 kWh ते 75 kWh ची बॅटरी पॅक दिली जाऊ शकते. ही गाडी सिंगल चार्जवर 500 km पर्यंत धावण्याची क्षमता ठेवणार असे म्हटले जात आहे.

किंमत किती असणार?

या गाडीची किंमत किती असणार? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत ही 25 लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होऊ शकते. ही गाडी महिंद्रा ने अलीकडेच लाँच केलेल्या BE6 आणि ह्युंदाई क्रेटा Ev सोबत स्पर्धा करणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe