Starlink, Airtel आणि रिलायन्स जिओमध्ये होणार घमासान! सॅटॅलाइट इंटरनेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल

एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.यामुळे देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये एक नवा स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा उभा झाला आहे.

Ratnakar Ashok Patil
Updated:

Satellite Internet Service:- एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.यामुळे देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये एक नवा स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा उभा झाला आहे.

अमेरिकेच्या या टायटन कंपनीने दूरसंचार विभागाची सहमती घेऊन भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवले आहेत. त्याचवेळी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन प्रमुख कंपन्यांनीही सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.

स्टारलिंकचा सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा

सरकारच्या विविध अटी मान्य केल्यानंतर स्टारलिंकने आपला मार्ग मोकळा केला आहे. परंतु आता प्रश्न आहे की कोणती कंपनी लवकर या सेवेची सुरूवात करणार आहे. आगामी महिन्यांत टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (DoT) कडून स्पेक्ट्रमचे वाटप केले जाऊ शकते.ज्यामुळे सॅटेलाईट इंटरनेट सेवा बाजारात एक नवीन वळण घेईल.

एअरटेलने सुरु केली तयारी

भारती एअरटेलने ही सॅटेलाईट टेलिकॉम सेवा सुरू करण्यासाठी आपला तयारीची घोषणा केली असून ते गुजरात व तामिळनाडूमध्ये त्यांच्या दोन स्थानकांच्या तयारीवर आधारित आहेत. मात्र सॅटेलाईट कंपन्यांना परवाना मिळवण्यासाठी लिलावाद्वारे स्पेक्ट्रम खरेदी करावी लागेल, आणि त्यानंतरच या सेवा सुरू होऊ शकतील.

तुम्ही विचार करत असाल की यापैकी कोणत्या कंपनीची सेवा आधी सुरू होईल, तर हे त्यांच्याकडून मिळालेल्या परवान्यांवर आणि स्पेक्ट्रम वाटपाच्या प्रक्रियेवर अवलंबून असेल. यामुळे या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांना नवे पर्याय मिळू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe