Vivo V50 Smartphone:- स्मार्टफोन क्षेत्रात सातत्याने नावीन्य आणणारी Vivo कंपनी लवकरच आपला नवीन Vivo V50 स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले असून हा फोन अत्यंत स्लीक डिझाइनसह दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप घेऊन येणार आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या Vivo S20 प्रमाणेच हा फोन दिसेल.मात्र काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
भन्नाट डिझाईन आणि आकर्षक लूक
लीक झालेल्या माहितीनुसार, Vivo V50 मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आणि रिंग-आकाराचे LED फ्लॅश युनिट असलेले गोळीच्या आकाराचे कॅमेरा मॉड्यूल असेल. टिपस्टर योगेश ब्रारने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्मार्टफोनचा गडद लाल रंग दिसतो,
जो त्याला प्रीमियम लुक देतो. तसेच, उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण देण्यात आले आहे. या स्टायलिश आणि स्लीम डिझाइनमुळे Vivo V50 बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो.
असेल दमदार बॅटरी
Vivo V50 हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ स्मार्टफोन असू शकतो.तरीही त्यामध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे दीर्घकालीन बॅकअप मिळण्याची शक्यता आहे.जी दिवसभर वापरणाऱ्या युजर्ससाठी आदर्श ठरेल. तुलनेत, Vivo V20 मध्ये 6500mAh बॅटरी होती मात्र नवीन Vivo V50 अधिक स्लीम असणार आहे.
उत्तम प्रोसेसरचा वापर
लीक झालेल्या माहितीनुसारVivo V50 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC प्रोसेसर असेल जो उत्तम परफॉर्मन्स आणि गतीसाठी ओळखला जातो. या प्रोसेसरमुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज शक्य होईल.
याशिवाय 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. या कॅमेराच्या मदतीने उच्च-गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येणार आहेत.
लाँचिंग आणि उपलब्धता
Vivo V50 भारतात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, हा स्मार्टफोन 18 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे सादर केला जाऊ शकतो. मागील लीकमधूनही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, Vivo V50 Pro वेरिएंटच्या लाँचिंगबाबत अद्याप स्पष्टता नाही.