Set-Top Box विसरा! 450+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स तुमच्या मोबाईलवर पहा

BSNL ने आपल्या वापरकर्त्यांना अधिक सुधारित सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याच संदर्भात बीएसएनएलने बीआयटीव्ही (BiTV) सेवा सुरू केली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

BiTV Service:- BSNL ने आपल्या वापरकर्त्यांना अधिक सुधारित सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याच संदर्भात बीएसएनएलने बीआयटीव्ही (BiTV) सेवा सुरू केली आहे.

ज्यामुळे तुम्हाला सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता न पडता स्मार्टफोनवर लाईव्ह टीव्ही पाहता येईल. ही सेवा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्यात आली असून ज्यामुळे तुम्हाला अनेक टीव्ही चॅनेल्सचा आनंद घेता येईल.

काय आहे बीएसएनएलची सेवा?

पहिल्यांदा बीएसएनएलने या सेवेची चाचणी तामिळनाडू आणि पुडुचेरी मध्ये केली होती आणि आता ते संपूर्ण देशभरात उपलब्ध करण्यात आले आहे.

बीआयटीव्ही सेवेच्या मदतीने BSNL आपल्या वापरकर्त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही पाहण्याची सुविधा पुरवते. ४५० हून अधिक लाईव्ह चॅनेल्स स्मार्टफोनवर पाहता येऊ शकतात. यामध्ये काही प्रीमियम चॅनेल्सदेखील समाविष्ट आहेत.

BiTV सेवेचा फायदा

BiTV सेवा वापरून तुम्हाला अनेक लोकप्रिय चॅनेल्स जसे की,भक्तीफ्लिक्स, कांचा लंका, स्टेज, शॉर्टफंडली, ओएम टीव्ही, प्लेफ्लिक्स, फॅनकोड, हबहॉपर, डिस्ट्रो आणि रन टीव्ही पाहता येतील. याशिवाय बीएसएनएलने अनेक मनोरंजन, क्रीडा, धार्मिक आणि इतर प्रकारचे चॅनेल्सदेखील उपलब्ध केले आहेत.

बीआयटीव्ही सेवा कशी सुरू करावी?

नोंदणी करा

पहिल्यांदा तुम्हाला बीएसएनएलच्या BiTV नोंदणी पृष्ठावर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा राज्य निवडावा लागेल.

OTP प्राप्त करा

नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवले जाईल.

सेवा सक्रिय करा

OTP एंटर केल्यानंतर, तुम्ही सेवा सक्रिय करू शकता आणि बीआयटीव्ही सेवा वापरण्यास प्रारंभ करू शकता.

अ‍ॅप डाउनलोड करा आणि सेवांचा आनंद घ्या

BiTV सेवा स्मार्टफोनवर पाहण्यासाठी तुम्हाला OTT Play अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरने लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचे सर्व फायदे उपभोगू शकता.

बीएसएनएलच्या BiTV सेवेच्या माध्यमातून आता तुमच्या स्मार्टफोनवर टीव्ही पाहणे सोपे आणि आरामदायक झाले आहे. यामुळे टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरच लाईव्ह टीव्ही चा आनंद घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe