Mahindra BE 6 लॉन्च! 628 किमी रेंज आणि 20 मिनिटात चार्ज होणारी कार

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत असताना महिंद्राने आपल्या नवीन ईव्ही महिंद्रा BE 6 ची लाँचिंग केली आहे. ज्यामुळे टाटा, मारुती आणि ह्युंदाईसारख्या प्रमुख कंपन्यांना चांगली टक्कर मिळणार आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Mahindra BE 6:- भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक लोकप्रिय होत असताना महिंद्राने आपल्या नवीन ईव्ही महिंद्रा BE 6 ची लाँचिंग केली आहे. ज्यामुळे टाटा, मारुती आणि ह्युंदाईसारख्या प्रमुख कंपन्यांना चांगली टक्कर मिळणार आहे. महिंद्राच्या या नवीन कारमध्ये 628 किलोमीटरची रेंज, जलद चार्जिंग आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. जे त्याला प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवते.

महिंद्रा BE 6 चे डिझाइन आणि फीचर्स

महिंद्रा BE 6 चे डिझाइन अत्यंत आकर्षक आणि आधुनिक आहे. ही कार लहान, स्पोर्टी आणि आलिशान दिसते. ज्यामुळे ती अधिक स्टायलिश आणि आकर्षक बनवते. कारमध्ये पॅनोरॅमिक ग्लास रूफ दिले जात आहे.ज्यामुळे इंटेरियर अधिक खुलून दिसते.

या कारमध्ये अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत. ड्युअल डिजिटल स्क्रीनसह वायरलेस फोन मिररिंग, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, हवामान नियंत्रण, तसेच आरामदायक आणि पॉवर असलेली फ्रंट सीट्स यासारखी सोयीस्कर आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये महिंद्रा BE 6 मध्ये दिली जात आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ड्रायव्हर केबिनच्या सुविधाही अधिक आरामदायक आणि कार्यक्षम आहेत.

महिंद्रा BE 6 ची पॉवरट्रेन

महिंद्रा BE 6 मध्ये एक दमदार पॉवरट्रेन दिला जात आहे. कंपनी 79 किलोवॅट क्षमतेची बॅटरी वापरणार असून ती 284 बीएचपी पॉवर आणि 380 एनएम टॉर्क जनरेट करेल. यामुळे गाडीच्या कामगिरीत उत्कृष्टता दिसून येईल.

याशिवाय जलद चार्जिंग सपोर्ट असल्याने, गाडी 20 मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होईल, आणि पूर्ण चार्ज झाल्यावर 628 किलोमीटरची रेंज देईल. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही कोणतीही अडचण येणार नाही.

किंमत आणि लाँच तारीख

महिंद्रा BE 6 च्या टेस्ट ड्राइव्हची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होईल आणि 11 फेब्रुवारीपासून बुकिंग प्रक्रिया सुरू होईल. महिंद्रा BE 6 च्या डिलिव्हरी मार्च 2025 मध्ये सुरू होईल.

किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय बाजारात महिंद्रा BE 6 ची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि टॉप व्हेरिएंटसाठी किंमत 26.90 लाख रुपये असेल.

महिंद्रा BE 6 ची लाँचिंग भारतीय बाजारात एक मोठा गेम चेंजर ठरू शकते. ज्यामुळे इतर कंपन्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.या कारची आकर्षक डिझाइन, उच्च रेंज आणि जलद चार्जिंगच्या सुविधांसह ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe