Vande Bharat Train:- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर आता तुम्हाला ट्रेन प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. नवी दिल्लीहून कटरा (श्री माता वैष्णो देवी) येथे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये केवळ शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. तसेच प्रवाशांना मांसाहारी अन्न किंवा नाश्ता घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये शाकाहारी भोजनाचा निर्णय
रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये सामान्यतः शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न तयार केले जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ही चिंता असते की त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल का? आता नवी दिल्ली-कटरा वंदे भारत एक्सप्रेस ही पूर्णपणे शाकाहारी भोजन पुरवणारी ट्रेन ठरली आहे. या ट्रेनमध्ये मांसाहारी पदार्थ पूर्णपणे वर्ज्य असतील.
या निर्णया मागील कारणे
श्री माता वैष्णो देवी यात्रा हिंदू भाविकांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे प्रवाशांसाठी शुद्ध शाकाहारी भोजन ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने मांसाहारी अन्न सोबत आणू नये. त्यावर आता बंदी असणार आहे.
ही घोषणा अशा वेळी आली आहे.जेव्हा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. बाबा जय गुरुदेव यांच्या भक्तांनी नुकताच शाकाहारी मेळा आयोजित केला. ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी शाकाहाराचा प्रचार केला. राज्य सरकारच्या निवेदनानुसार प्रयागराज महाकुंभ संकुल सामाजिक संदेशांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
मेळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी “बाबाजी म्हणतात की आपण शाकाहारी राहिले पाहिजे” असे नारे दिले आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी शाकाहारी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संकल्प केला. यामुळे शाकाहाराबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
प्रवाशांनी आधीच काळजी घ्यावी ज्या प्रवाशांना मांसाहारी अन्न खाण्याची सवय आहे. त्यांनी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यास रेल्वे प्रशासन कारवाई करू शकते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने हे नियम लक्षात ठेवावे आणि नियोजन करूनच प्रवास करावा.
ही घोषणा शाकाहारी प्रवाशांसाठी आनंदाची बाब असली तरी मांसाहार करणाऱ्या प्रवाशांनी या नियमांची नोंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे