Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ म्युच्युअल फंडमध्ये 3,500 रुपयांची SIP केली तरी मिळणार 2 कोटी रुपयांचा परतावा

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मोठा नफा मिळतोय. यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. शेअर बाजारावर आधारित काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्यावर चांगला परतावा दिला आहे.

Tejas B Shelar
Published:

Mutual Fund Scheme : म्युचल फंडात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण अशा एका म्युच्युअल फंडाची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये अवघ्या साडेतीन हजार रुपयांचे एसआयपी करून गुंतवणूकदारांनी 2 कोटी रुपयांचा परतावा मिळवला आहे.

मंडळी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मोठा नफा मिळतोय. यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. शेअर बाजारावर आधारित काही म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्यावर चांगला परतावा दिला आहे.

फक्त दीर्घ कालावधीतच नाही तर तीन वर्षे पाच वर्षे आणि दहा वर्षे कालावधीच्या टप्प्यावर देखील काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. एसबीआय कन्झम्पशन अपॉर्च्यूनिटीज फंड हा सुद्धा असाच एक लोकप्रिय फंड आहे. आता या योजनेला लवकरच 26 वर्षे पूर्ण होणार आहेत. दरम्यान आज आपण या म्युच्युअल फंडाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआय कन्झम्पशन अपॉर्च्यूनिटीज फंडाची कामगिरी

हा फंड एक ओपन इंडेड इक्विटी स्कीम आहे पण यात इतर म्युच्युअल फंडाच्या तुलनेत अधिक जोखीम असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. यातून चांगला परतावा मिळतोय मात्र जोखीम अधिक आहे. यामुळे ज्या ग्राहकांना जोखीम सहीन होईल त्यांनीच यामध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

कारण की यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना फायदा मिळतोय तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकते. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठीच ठीक आहे यामुळे ज्यांना पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांनी यापासून दूरच राहिलेले बरे.

जर तुम्हाला पाच वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला यातून चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. आता आपण या म्युच्युअल फंडणे एसआयपी गुंतवणुकीवर किती परतावा दिला आहे आणि एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला आहे याबाबत माहिती पाहुयात.

SIP गुंतवणुकीवर किती परतावा दिला

गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या म्युच्युअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 19.15% दराने परतावा दिला आहे. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड मध्ये 3500 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर त्या गुंतवणूकदाराला यातून आजच्या घडीला जवळपास एक कोटी 90 लाख 38 हजार रुपये मिळाले असते. यामध्ये सदर गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही फक्त दहा लाख 50 हजार रुपयांची राहिली असते.

एक रकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला

एक रकमी गुंतवणुकीवर या म्युच्युअल फंडणे 20 वर्षांमध्ये वार्षिक 18.82% दराने परतावा दिला आहे. दहा वर्षांमध्ये वार्षिक 15.07% दराने परतावा दिला आहे. सात वर्षांमध्ये वार्षिक 14.34% दराने परतावा दिला आहे.

पाच वर्षांमध्ये वार्षिक 20.54% दराने परतावा दिला आहे. तीन वर्षांमध्ये 18.65% दराने परतावा दिला आहे. एक वर्षांमध्ये 12.58% दराने परतावा दिला आहे. लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत या फंडाने वार्षिक 15.69 टक्के दराने परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe