MG Comet EV:- शहरी भागात सहज चालवता येईल अशी आणि 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक कार शोधत असाल तर एमजी कॉमेट ईव्ही हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार केवळ किफायतशीर नाही तर तिचे डिझाइन, तंत्रज्ञान आणि फीचर्सदेखील अत्याधुनिक आहेत.
इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता परवडणाऱ्या श्रेणीतील गाड्याही उत्तम वैशिष्ट्यांसह येऊ लागल्या आहेत आणि एमजी कॉमेट याचे उत्तम उदाहरण आहे.
कशी आहे डिझाइन?
एमजी कॉमेट ईव्हीचे डिझाइन अत्यंत आकर्षक आणि आधुनिक आहे. ही एक मिनी हॅचबॅक असून तिचे डिझाइन “ग्लोबल स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
ही दोन डोअरची टॉल-बॉय हॅचबॅक असून तिच्यात चार जण आरामात बसू शकतात. तिच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ती शहरी वाहतुकीसाठी उत्तम पर्याय ठरते. तिचे लूक अत्यंत आकर्षक असून ती पाहताच कोणालाही आकर्षित करणारी आहे.
टेक्नॉलॉजी आणि इन्फोटेनमेंट सिस्टम
एमजी कॉमेट ईव्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीतही कोणत्याही महागड्या कारपेक्षा कमी नाही. यात iSMART इन्फोटेनमेंट सिस्टम दिली असून, ती 55+ कनेक्टेड फीचर्स सपोर्ट करते. यामध्ये रिमोट व्हेईकल कंट्रोल सारख्या अनेक अत्याधुनिक सुविधा मिळतात.
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे कार लॉक/अनलॉक करू शकता.एसी सुरू करू शकता आणि वाहनाची स्थिती तपासू शकता. याशिवाय लाइव्ह लोकेशन शेअरिंग आणि ट्रॅकिंग सुविधा देखील यात उपलब्ध आहे.
ही कार 100+ व्हॉइस कमांड्सला सपोर्ट करते.ज्यामध्ये 35+ इंग्लिश कमांड्सही समाविष्ट आहेत. त्यामुळे तुम्ही आवाजाच्या सहाय्याने अनेक फंक्शन्स कंट्रोल करू शकता. जे ड्रायव्हिंग अधिक सोपी आणि सुरक्षित बनवतात.
सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग कंट्रोल
एमजी कॉमेट ईव्हीमध्ये आधुनिक सुरक्षा प्रणाली देखील देण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-होल्ड कंट्रोल, क्रिप मोड, आणि पॉवर्ड ORVMs यांसारखे महत्त्वाचे फीचर्स मिळतात. ही कार फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ चार्जिंगसाठी थांबावे लागत नाही.
रेंज आणि चार्जिंग क्षमता
एमजी कॉमेट ईव्ही 230 किलोमीटरची प्रमाणित रेंज देते. मात्र ही रेंज विविध घटकांवर अवलंबून असते जसे की, ड्रायव्हिंगची पद्धत, हवामान, वेग आणि रस्त्यांची परिस्थिती. कारमध्ये 17.3 kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे.जी 7.4 kW चार्जरच्या सहाय्याने चार्ज करता येते. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तासांचा कालावधी लागतो.
कुठे वापर ठरेल फायद्याचा?
ही कार विशेषतः शहरी वापरासाठी योग्य आहे. तिचे कॉम्पॅक्ट डिझाइन आणि सहज चालवता येण्याची क्षमता यामुळे ती जास्त गर्दीच्या भागातही चालवायला सोपी जाते.
ज्यांना इको-फ्रेंडली, परवडणारी आणि तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज इलेक्ट्रिक कार हवी आहे.त्यांच्यासाठी एमजी कॉमेट एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
का ठरेल ही कार फायद्याची?
एमजी कॉमेट ईव्ही ही केवळ किफायतशीर नाही तर अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज अशी इलेक्ट्रिक कार आहे. तिची आकर्षक रचना, दमदार बॅटरी, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा प्रणाली यामुळे ती प्रीमियम इलेक्ट्रिक कारच्या तोडीस तोड ठरते. शहरी भागात कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक वाहन चालवायचे असेल तर ही कार तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम निवड ठरू शकते.