2024 मध्ये कोणता स्मार्टफोन सर्वाधिक विकला गेला? नाव ऐकून तुम्ही विश्वास ठेवणार नाही!

2024 मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत अॅपल आणि सॅमसंगने वर्चस्व गाजवले. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार अॅपलचा आयफोन 15 हा जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्रो यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

Ratnakar Ashok Patil
Published:

Best Selling Smartphone:- 2024 मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत अॅपल आणि सॅमसंगने वर्चस्व गाजवले. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार अॅपलचा आयफोन 15 हा जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्रो यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.

विशेषतः अमेरिका आणि चीनमध्ये या स्मार्टफोनच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय अॅपलच्या प्रो मॉडेल्सकडे ग्राहकांचा कल वाढला असून यंदा कंपनीच्या एकूण विक्रीपैकी निम्म्याहून अधिक विक्री प्रो मॉडेल्समधून झाली आहे.

हे स्मार्टफोन अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी अॅपलने फायनान्सिंग पर्याय आणि ट्रेड-इन योजना आणल्या. ज्यामुळे विक्रीला आणखी गती मिळाली.

सॅमसंगची जबरदस्त कामगिरी

सॅमसंगसाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. कारण 2018 नंतर पहिल्यांदाच गॅलेक्सी एस24 अल्ट्राने टॉप 10 यादीत स्थान मिळवले. हा फोन विशेषतः त्याच्या AI फीचर्समुळे लोकप्रिय ठरला. त्यातील चॅट/नोट असिस्ट, सर्कल टू सर्च आणि लाईव्ह ट्रान्सलेशन यांसारखी तंत्रज्ञानाधारित वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना अधिक आकर्षक वाटली.

याशिवाय, सॅमसंगच्या गॅलेक्सी A15 5G आणि A15 4G या मॉडेल्सची उत्तम विक्री झाली. विशेषतः उत्तर अमेरिकेत. यामुळे सॅमसंगने आपल्या ए-सिरीज फोनसह बाजारात मजबूत पकड निर्माण केली आहे.

2024 मध्ये स्मार्टफोन मार्केटवर ॲपलचे वर्चस्व

2024 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत अॅपलने वर्चस्व राखले असून, आयफोन 15, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 15 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स आणि आयफोन 16 प्रो हे पाच मॉडेल्स टॉप 10 यादीत आहेत.

दुसरीकडे, सॅमसंगचे गॅलेक्सी A15 5G, A15 4G, गॅलेक्सी एस24 अल्ट्रा आणि गॅलेक्सी A05 या चार स्मार्टफोन्सनी देखील चांगली विक्री नोंदवली आहे. यामध्ये आयफोन 14 देखील स्थान टिकवून आहे.

2025 मध्ये या स्मार्टफोनची मागणीत होईल वाढ

तज्ज्ञांच्या मते 2025 मध्ये जनरेटिव्ह AI (GenAI) क्षमता असलेल्या स्मार्टफोनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. 2024 च्या टॉप 10 यादीतील निम्म्या स्मार्टफोन्समध्ये आधीच AI-आधारित फीचर्स होते. त्यामुळे येत्या काळात हा ट्रेंड आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सॅमसंग आणि अॅपल यासारखे ब्रँड त्यांच्या प्रीमियम मॉडेल्समध्ये हे फीचर्स अधिक विकसित करण्यावर भर देत आहेत. भविष्यात स्मार्टफोन्स केवळ हार्डवेअरच्या बाबतीत नव्हे तर AI आणि सॉफ्टवेअर इंटेलिजन्सच्या आधारे अधिक प्रगत होत जातील.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2024 मध्ये सर्वाधिक विक्री झालेले हे टॉप मॉडेल्स तुम्हाला सर्वोत्तम अनुभव देऊ शकतात.

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील वैशिष्ट्ये आणि नवीनतम तंत्रज्ञान आहे, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे ठरेल. 2025 मध्ये स्मार्टफोन बाजार आणखी कसा विकसित होतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe