SBI चा म्युच्युअल फंड ठरणार फायद्याचा ! 3,000 रुपयांची SIP करून मिळणार 1.39 कोटी रुपयांचा परतावा

एसबीआयचे एकूण तीन म्युच्युअल फंड असून या फंडांमधून गुंतवणूकदारांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या काळात चांगला जबरदस्त परतावा या ठिकाणी मिळाला आहे. अवघ्या काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत.

Tejas B Shelar
Published:

SBI Mutual Fund : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा कुठेतरी गुंतवायचं असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडाचा पर्याय बेस्ट ठेवणार आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. दरम्यान जर तुम्हाला आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे.

आज आपण एसबीआयच्या म्युच्युअल फंडाची माहिती जाणून घेणार आहोत. म्युच्युअल फंड बाजारात तुम्हाला विविध कंपन्यांचे म्युच्युअल फंड पाहायला मिळतील. बाजारात एसबीआयचे देखील म्युच्युअल फंड आहेत.

एसबीआयचे एकूण तीन म्युच्युअल फंड असून या फंडांमधून गुंतवणूकदारांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या काळात चांगला जबरदस्त परतावा या ठिकाणी मिळाला आहे. अवघ्या काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत.

SBI Healthcare Opportunities Fund मध्ये गेल्या 25 वर्षात दरमहा तीन हजार रुपये SIP द्वारे गुंतवणूक गुंतवणूकदारांना 1.39 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण SBI Healthcare Opportunities Fund बाबत माहिती पाहणार आहोत.

SBI हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड

पाच जुलै 1999 मध्ये या म्युच्युअल फंड ची सुरुवात झाली. म्हणजेच हा म्युच्युअल फंड जवळपास 25 वर्षे जुना असून या 25 वर्षांच्या काळात या फंडातून गुंतवणूकदारांनी छप्परफाड कमाई केली आहे. सध्या या फंडात किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते, अन किमान 500 रुपयांच्या मासिक एसआयपी करता येत आहे.

या योजनेचा बेंचमार्क बीएसई हेल्थकेअर टीआरआय आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत या योजनेची एकूण मालमत्ता 3542 कोटी रुपये आहे, तर खर्चाचे प्रमाण 1.94 टक्के आहे. तन्मय देसाई आणि प्रदीप केशवन हे फंड मॅनेजर आहेत.

SBI Healthcare Opportunities Fund जेव्हापासून लॉन्च झाला आहे तेव्हापासून यामध्ये एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक १६.८४ टक्के परतावा मिळाला आहे. तसेच एसआयपी करणाऱ्या म्हणजेच महिन्याला गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या कालावधीत वार्षिक १८.१५ टक्के या दराने परतावा मिळाला आहे.

अर्थातच इतर म्युच्युअल फंडाच्या तुलनेत एसबीआयचा हा फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरलाय. लॉन्ग टर्म मध्ये या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून जर तुम्हाला ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हा फंड फायद्याचा ठरेल अशी शक्यता आहे.

हा SBI Mutual Fund सुरू झाल्यापासून जर कोणी यात दरमहा ३००० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे मूल्य आता १.३९ कोटी रुपये झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत या म्युचुअल फंड मध्ये दरमहा 3000 रुपयाची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 18.15% दराने रिटर्न मिळाले आहेत.

या पंचवीस वर्षांच्या काळात तीन हजाराची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराला एक कोटी 38 लाख 56 हजार 391 रुपये रिटर्न मिळाले आहेत. यामध्ये नऊ लाख रुपये गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक आहे आणि उर्वरित रक्कम ही त्याला व्याज स्वरूपात रिटन म्हणून मिळालेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe