Kia Syros vs Maruti Breeza:- भारतीय बाजारपेठेत सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा आहे. चार मीटरच्या आत असलेल्या या श्रेणीत सर्व प्रमुख कंपन्या आकर्षक आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह त्यांच्या कार सादर करत आहेत. नुकतीच किआने आपली नवी एसयूव्ही ‘सायरोस’ फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच केली होती.जी थेट मारुती ब्रेझाशी स्पर्धा करणार आहे. या दोन गाड्यांमधील प्रमुख फरक, इंजिन क्षमता, फीचर्स आणि किंमती याबाबत सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला योग्य पर्याय निवडणे सोपे जाईल.
किया सायरोस आणि ब्रिजामधील फरक
इंजिन आणि परफॉर्मन्स
किआ सायरोस दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह बाजारात आली आहे. यात 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 120 पीएस पॉवर आणि 172 एनएम टॉर्क निर्माण करते.
तसेच यात 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील आहे.जे 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन प्रकार मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहेत.
दुसरीकडे मारुती ब्रेझामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे K15C स्मार्ट हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 103.1 पीएस पॉवर आणि 136.8 एनएम टॉर्क निर्माण करते.
या एसयूव्हीमध्ये 48 लिटरची इंधन टाकी असून मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ती प्रति लिटर 19.88 किमी मायलेज देते. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 19.80 किमी मायलेज देते.
फीचर्स आणि तंत्रज्ञान
किआ सायरोसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. यात 30-इंचाचा ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनल, कनेक्टेड कार नेव्हिगेशन सिस्टम, ड्युअल-पेन सनरूफ, 64 रंगांचे अँबियंट लाइटिंग, रिअर सीट रिक्लाइन, स्लाइड आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी अनेक प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत.
मारुती ब्रेझामध्ये देखील अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, 9-इंचाचा स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, रियर एसी व्हेंट, प्रोजेक्टर हेडलॅम्प, शार्क फिन अँटेना आणि गियर शिफ्ट इंडिकेटर यांचा समावेश आहे.
सुरक्षा वैशिष्ट्ये
किआ सायरोसमध्ये लेव्हल-2 एडीएएससह (Advanced Driver Assistance System) 15 ऑटोनॉमस सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ओटीए अपडेट्स (Over-the-Air Updates), मानक सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, पार्किंग कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
मारुती ब्रेझामध्ये ईएसपी (Electronic Stability Program), हिल होल्ड असिस्ट, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर एअरबॅग्ज, रियर व्ह्यू कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हाय स्पीड अलर्ट, रियर वायपर आणि वॉशर, रियर डिफॉगर, अँटी-थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम, इंजिन इमोबिलायझर, ISOFIX चाइल्ड अँकरेज आणि सेंट्रल लॉकिंग यांसारखी महत्त्वाची सुरक्षा फीचर्स दिली आहेत.
डायमेंशन्स कसे आहे?
किआ सायरोसची लांबी 3915 मिमी, रुंदी 1805 मिमी आणि उंची 1625 मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस 2550 मिमी असून यात 390 लिटरची बूट स्पेस आहे.
मारुती ब्रेझाची लांबीही 3995 मिमीच आहे, मात्र तिची रुंदी 1790 मिमी आणि उंची 1685 मिमी आहे. ब्रेझाचा व्हीलबेस 2500 मिमी असून बूट स्पेस 328 लिटर आहे.जी सायरोसच्या तुलनेत थोडी कमी आहे.
किंमत तुलना
किआ सायरोसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये आहे, तर तिच्या टॉप व्हेरिएंटसाठी 16.70 लाख रुपये मोजावे लागतील.
मारुती ब्रेझाची किंमत तुलनेने थोडी परवडणारी आहे. तिच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.34 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 13.98 लाख रुपये आहे.
कोणती एसयूव्ही चांगली?
जर तुम्हाला अधिक शक्तिशाली इंजिन, प्रीमियम फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान हवे असेल तर किआ सायरोस हा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः ड्युअल-पेन सनरूफ, मोठा डिस्प्ले आणि एडीएएस यांसारखी प्रगत सुरक्षा फीचर्स याला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.
दुसरीकडे जर तुम्ही इंधन कार्यक्षमतेला आणि परवडणाऱ्या किंमतीला प्राधान्य देत असाल तर मारुती ब्रेझा हा चांगला पर्याय ठरू शकतो. मारुतीची सर्व्हिस नेटवर्क मजबूत आहे आणि स्पेअर पार्ट्स सहज उपलब्ध होतात.त्यामुळे दीर्घकाळ टिकणारी आणि कमी देखभाल खर्च असलेली कार शोधत असाल तर ब्रेझा तुमच्यासाठी योग्य ठरेल.
गरजेनुसार निवड करा
किआ सायरोस आणि मारुती ब्रेझा या दोन्ही गाड्या त्यांच्या-त्यांच्या प्रकारात उत्तम आहेत. जर तुम्हाला अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रीमियम अनुभव हवा असेल तर किआ सायरोस एक उत्तम पर्याय आहे.
मात्र जर तुम्ही बजेट आणि इंधन कार्यक्षमतेला प्राधान्य देत असाल तर मारुती ब्रेझा हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. तुमच्या गरजा आणि प्राधान्यांनुसार योग्य पर्याय निवडणेच अधिक महत्त्वाचे आहे.