शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘ही’ स्मॉलकॅप कंपनी 1:3 बोनस शेअर देणार, रेकॉर्ड डेट नोट करा

स्मॉलकॅप कंपनी एसबीसी एक्सपोर्ट्सने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा या ठिकाणी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क थांबविण्याची घोषणा केली होती अन याचाच परिणाम म्हणून या शेअरमध्ये ही वाढ झाली.

Tejas B Shelar
Published:

Bonus Share 2025 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण झाली आणि यामुळे गुंतवणूकदार हताश झालेत. मात्र मंगळवारचा दिवस शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक राहिला.

मंगळवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली आणि त्यामुळे गुंतवणूकदार उत्साही राहिलेत. खरे तर गेल्या काही दिवसांच्या काळात शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी बोनस शेअरची घोषणा केली आहे.

अन अशातच आता शेअर बाजारात सूची बद्दल असणाऱ्या आणखी एका स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केलेली आहे.

स्मॉलकॅप कंपनी एसबीसी एक्सपोर्ट्सने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा या ठिकाणी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले शुल्क थांबविण्याची घोषणा केली होती अन याचाच परिणाम म्हणून या शेअरमध्ये ही वाढ झाली. एकाच ट्रेडिंग सेशनमध्ये आठ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याने हा स्टॉक काल फोकस मध्ये आला होता.

दुसरीकडे या कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा देखील केली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये या स्टॉकबाबत चर्चा सुरू आहेत. मंडळी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक दोन विद्यमान शेअर्समागे एक अतिरिक्त शेअर विनामूल्य जारी केला जाणार आहे. फ्री बोनस शेअरच्या घोषणेमुळे सुद्धा सध्या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आहे.

विशेष म्हणजे या स्मॉल कॅप कंपनीने बोनस शेअर्ससाठी पात्र भागधारकांची ओळख पटविण्यासाठी अद्याप रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही, जी नंतर निश्चित केली जाईल. या स्टॉकच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर गेल्या 3 सत्रापासून यात सातत्याने घसरण होत आहे.

गेल्या एका महिन्यात या स्टॉक मध्ये 22% हून अधिकची घसरण झाली आहे. तसेच सहा महिन्यांमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरलाय. गेल्या एका वर्षाचा विचार केला असता गेल्या बारा महिन्यांमध्ये हा स्टॉक १३ टक्क्याहुन अधिक घसरलाय.

मात्र पाच वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 175 टक्क्याहून अधिकचा परतावा दिला आहे. काल, मंगळवारी दुपारी 12 वाजता हा स्टॉक 20.91 रुपयांवर ट्रेड करत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe