खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारातून PF कापला जात असेल तर आता तुम्हाला…..

EPFO Interest Rate 2025 : एक जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर एक फेब्रुवारीला प्रथमच पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला आणि या अर्थसंकल्पात मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केल्याचे दिसले.

अर्थसंकल्पात पगारदार लोकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदार लोकांचे उत्पन्न करमुक्त करण्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आता अर्थसंकल्पानंतरही मध्यमवर्गीय लोकांसाठी आणि पगारदार लोकांसाठी मोठे निर्णय होतील असे दिसत आहे.

मंडळी सरकारकडून मध्यमवर्गीय पगारदार लोकांसाठी एकामागून एक घोषणा केल्या जात आहेत आणि आश्वासने दिली जात आहेत, ज्यांचा उद्देश मध्यमवर्गाच्या पाकिटात जास्त पैसा ठेवून आणि कान्जप्शन वाढवून बाजारात मागणी निर्माण करणे आहे, जेणेकरून बाजाराला गती मिळू शकेल.

दरम्यान वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांचे उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता सरकारकडून पीएफ ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे पगारदार लोकांसाठी हे एक दुहेरी गिफ्ट ठरणार आहे. पीएफ ठेवींवरील व्याजदरात सरकारने वाढ केली तर नक्कीच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होताना दिसेल.

केव्हा होणार निर्णय ?

मिळालेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी 2025 रोजी ईपीएफओ च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नोकरदारांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत नियोक्ता संघटना आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. खरेतर, चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदर अद्याप निश्चित झालेला नाहीये. पीएफ ठेवींवरील व्याजदराच्या संदर्भात अजून कोणताच निर्णय झालेला नाही.

मात्र 28 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 2024-25 या वर्षासाठी पीएफ ठेवींवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

असे झाल्यास कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. खरेतर, केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत सातत्याने पीएफ ठेवींवरील व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीसे होणार असे दिसते.

याआधी २०२२-२३ मध्ये पीएफचा व्याजदर ८.१५% झाला होता तर २०२३-२४ मध्ये ८.२५ टक्के करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही बँकांच्या बेस रेटचा विचार करता PF वरील व्याजदर थोडेसे तरी वाढवले जाईल, अशी शक्यता असल्याचे बोलले जात आहे.