छोट्या कुटुंबासाठी सर्वोत्तम SUV कार्स! 28 किमी मायलेज आणि कमी किमतीत धमाल

आजच्या काळात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्स भारतीय बाजारात एक आकर्षक पर्याय बनल्या आहेत. या कार्समध्ये जबरदस्त मायलेज, आकर्षक डिझाइन, आणि किफायतशीर किंमत असते. ज्यामुळे छोट्या कुटुंबासाठी या कार्स खूप परफेक्ट ठरतात.

Ratnakar Ashok Patil
Published:

Budget SUV Car 2025:- आजच्या काळात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्स भारतीय बाजारात एक आकर्षक पर्याय बनल्या आहेत. या कार्समध्ये जबरदस्त मायलेज, आकर्षक डिझाइन, आणि किफायतशीर किंमत असते. ज्यामुळे छोट्या कुटुंबासाठी या कार्स खूप परफेक्ट ठरतात. चांगला मायलेज, उत्तम परफॉर्मन्स आणि लक्झरी अनुभव एकाच गाडीमध्ये मिळवता येतो आणि याच कारणामुळे ही कार्स खूप लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.

मारुती ब्रेझा

तुम्ही छोट्या कुटुंबासाठी सर्च करत असाल तर मारुती ब्रेझा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. या कारचा पेट्रोल वेरियंट 19 किमी मायलेज देतो.तर CNG वेरियंट 25.5 किमी मायलेज देते. ब्रेझाची किंमत 8.34 लाख रुपये आहे. जी एकदम किफायतशीर आणि बजेट फ्रेंडली आहे. या कारमध्ये चांगले इंटीरियर्स, आरामदायक सीटिंग, आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. ब्रेझाच्या स्पीड आणि कंफर्टमुळे ती खूपच लोकप्रिय ठरली आहे.

Nissan Magnite

निसान मॅग्नाईट हा एक 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेला अद्भुत पर्याय आहे. या कारमध्ये 19.7 किमी मायलेज मिळवता येतो आणि त्याची किंमत 5.99 लाख रुपये आहे. Magnite मध्ये गाड्यांचे डिज़ाइन अत्यंत आकर्षक आहे.

त्याचसोबत यामध्ये मोठ्या इन्फोटेनमेंट स्क्रीन, स्मार्ट डॅशबोर्ड, आणि आरामदायक ड्रायविंग एक्सपीरियन्सचा अनुभव दिला जातो. आपल्याला एका कॉम्पॅक्ट परंतु प्रीमियम लुक असलेल्या गाड्याचा अनुभव मिळवायचा असेल तर निसान मॅग्नाईट हा उत्तम पर्याय आहे.

Mahindra XUV 3OO

महिंद्रा XUV 3OO हा 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेला एसयूव्ही आहे. जो प्रति लिटर 20 किमी मायलेज देतो. या गाडीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. Mahindra XUV 3OO चा इंटीरियर्स उत्तम आहे.

तसेच त्यात फ्रंट पार्किंग सेंसर्स, LED DRLs, आणि बिग इंफोटेनमेंट डिस्प्ले सारखी सुविधा उपलब्ध आहे. हे वाहन आपल्या कुटुंबासाठी एक खूप उत्कृष्ट आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देते.

Renault Kiger

Renault Kiger मध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.ज्यामुळे ती 20.5 किमी मायलेज देते. याची किंमत फक्त 6 लाख रुपये आहे आणि ही कार निश्चितच एक बजेट फ्रेंडली पर्याय ठरते.

Kiger मध्ये अॅडव्हान्स ड्रायविंग मोड्स, स्पीड सेंसिटिव्ह ड्यूल एयरबॅग्स आणि डिजिटल डिस्प्ले असलेले सुविधाजनक इंटीरियर्स मिळतात. तिच्या किफायतशीर किंमतीमुळे हे कुटुंबासाठी परफेक्ट कार ठरते.

मारुती फ्रॉन्क्स आणि टोयोटा टेझर

मारुती फ्रॉन्क्स आणि टोयोटा टेझर ह्या दोन गाड्यांची यंत्रणा समान आहे. या दोन्ही गाड्या 22 किमीपर्यंत मायलेज देतात तर CNG वेरियंटमध्ये 28.5 किमी मायलेज मिळवता येतो. या गाड्यांमध्ये स्मार्ट लुक्स,

मूल्यवर्धित इंटीरियर्स आणि फ्लेक्सिबल ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स मिळतो.याची किंमत 7.51 लाख रुपये आहे. टोयोटा टेझर आणि मारुती फ्रॉन्क्स दोन्ही एक सुपरब कंफर्ट आणि सॅफ्टी फीचर्ससह येतात. ज्यामुळे ती छोट्या कुटुंबासाठी आदर्श पर्याय ठरते.

आजच्या काळात, छोट्या कुटुंबासाठी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्स हे एक उत्तम पर्याय ठरू शकतात. त्या कुटुंबाच्या गरजांसाठी किफायतशीर, आरामदायक आणि उत्तम मायलेज इत्यादी वैशिष्ट्य समाविष्ट आहेत.

तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम आणि परफेक्ट कार निवडण्याची वेळ आली आहे आणि यामध्ये मारुती ब्रेझा, निसान मॅग्नाईट, महिंद्रा XUV 3OO, रेनो किगर आणि टोयोटा टेझर ह्या गाड्या तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe