TVS Jupiter CNG Scooter :- टीव्हीएसने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपली पहिली ज्युपिटर सीएनजी स्कूटर सादर करून एक नवा इतिहास रचला. सीएनजी स्कूटरचे आगमन भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. अहवालानुसार, ही अत्याधुनिक स्कूटर या महिन्यात लाँच होण्याची शक्यता असून त्याच्या किंमतीचाही अधिकृत खुलासा केला जाईल.
सीएनजीसह उत्कृष्ट मायलेज
![tvs jupiter cng scooter](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/tvss.jpg)
टीव्हीएसने ज्युपिटर सीएनजीमध्ये 1.4 किलो क्षमतेची सीएनजी टाकी दिली आहे.जी सीटखाली ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, सीएनजीवर ही स्कूटर 84 किमी प्रति किलो मायलेज देईल आणि पेट्रोल-सीएनजी दोन्ही मिळून एकूण 226 किमीचा प्रवास सहज शक्य होईल. पेट्रोल टाकीची क्षमता 2 लिटर असल्यामुळे रिझर्व्ह इंधनचा पर्यायही उपलब्ध आहे.
ज्युपिटर सीएनजीमध्ये सर्वात मोठी सीट
राइडिंगच्या अनुभवाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी टीव्हीएसने या स्कूटरमध्ये सर्वात मोठी सीट दिली आहे. यासोबतच मेटल बॉडी, एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅप आणि ऑल-इन-वन लॉकिंग सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये देखील यात समाविष्ट आहेत.
शक्तिशाली इंजिन
ही स्कूटर OBD2B अनुरूप 125cc सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे.जे 5.3 BHP पॉवर आणि 9.4 Nm टॉर्क निर्माण करते. त्याचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे.जो शहरी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम मानला जातो.
पहिली सीएनजी स्कूटर
सध्या भारतीय बाजारात टीव्हीएसच एकमेव ब्रँड आहे जो सीएनजी स्कूटर सादर करत आहे. यामुळे कंपनीला स्पर्धेत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
किंमत
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजीची सुरुवातीची किंमत सुमारे 95,000 हजार असण्याची शक्यता आहे. तुलनेत ज्युपिटरच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 88,174 ते 99,015 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही सीएनजी स्कूटर लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये मोठी लोकप्रियता मिळवेल अशी शक्यता आहे.
कधी होणार लाँच ?
अंदाजानुसार, टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी 2025 च्या पहिल्या तिमाहीत अधिकृतपणे लाँच होऊ शकते. कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी ग्राहकांमध्ये या स्कूटरबाबत मोठी उत्सुकता आहे. जर तुम्ही इंधन बचतीस प्राधान्य देत असाल आणि कमी खर्चात जास्त मायलेज मिळवायचे असेल तर ही स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.