Realme P3 Pro लवकरच लॉन्च होणार ! 6000mAh बॅटरी आणि Snapdragon 7s Gen प्रोसेसरसह

Karuna Gaikwad
Published:

Realme ने आपल्या P3 मालिकेच्या विस्ताराची घोषणा करताना, आता Realme P3 Pro 5G च्या भारतातील लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे

की हा स्मार्टफोन 18 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय बाजारात सादर केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल स्पेसिफिकेशन्ससह अत्याधुनिक फीचर्स असतील, ज्यामुळे ग्राहकांना उत्तम परफॉर्मन्सचा अनुभव मिळेल.

भारतात कधी लॉन्च होणार?
Realme P3 Pro 5G चा अधिकृत भारतातील लॉन्च 18 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. दुपारी 12:00 वाजता ऑनलाईन इव्हेंटद्वारे फोनचे अनावरण केले जाईल.लॉन्चनंतर, हा स्मार्टफोन Flipkart, Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध होईल. कंपनीच्या वेबसाइट आणि Flipkart वर फोनसाठी मायक्रोसाइट आधीच लाईव्ह झाली आहे, जिथे याच्या फीचर्सची झलक पाहायला मिळाली आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले – क्वाड-कर्व्ड EdgeFlow टेक्नॉलॉजी Realme P3 Pro मध्ये क्वाड-कर्व्ड EdgeFlow डिस्प्ले असेल, जो या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.विशेषतः गेमिंग आणि इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभवासाठी डिझाइन केला आहे. स्मूद एज स्वाइप टेक्नॉलॉजी – ज्यामुळे गेमिंगदरम्यान जलद आणि अचूक नियंत्रण मिळेल.

प्रोसेसर
Snapdragon 7s Gen 3 सह अत्याधुनिक परफॉर्मन्स Snapdragon 7s Gen 3 चिपसेटसह हा फोन दमदार परफॉर्मन्स देईल. 4nm TSMC प्रोसेसवर आधारित, यामुळे पॉवर-एफिशियंट आणि वेगवान अनुभव मिळेल. 20% वेगवान CPU कार्यप्रदर्शन आणि 40% अधिक GPU क्षमता. 800K+ Antutu स्कोअर – ज्यामुळे फोन मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी परफेक्ट ठरेल.

चार्जिंग –
6000mAh Titan बॅटरी + 80W फास्ट चार्जिंग : 6000mAh ची दमदार बॅटरी – एकाच चार्जमध्ये दीर्घकाळ गेमिंग आणि ब्राउझिंगचा अनुभव. 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट – बॅटरी कमी वेळात पूर्ण चार्ज होईल.6050mm² च्या मोठ्या VC कुलिंग एरियासह स्मार्टफोनचा थंड आणि स्थिर परफॉर्मन्स राखला जाईल.दीर्घकाळ गेमिंग दरम्यान उष्णता कमी करण्यासाठी विशेष टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. फोनचा फ्रेम रेट स्थिर ठेवून उच्च दर्जाचा गेमिंग अनुभव मिळेल.

Realme P3 Pro 5G हा भारतीय गेमर्स आणि पॉवर युजर्ससाठी एक मोठा गेमचेंजर ठरू शकतो. Snapdragon 7s Gen 3, 6000mAh बॅटरी आणि अत्याधुनिक गेमिंग फीचर्ससह हा स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करू शकतो. 18 फेब्रुवारीला लॉन्च झाल्यावर तुम्ही Flipkart आणि Realme च्या वेबसाइटवरून हा फोन खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe