‘इतका’ पगार असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना EPFO मधून अडीच कोटी मिळणार !

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर एक मोठा निधी मिळत असतो. खरे तर या योजनेत खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या माध्यमातून एक ठराविक रक्कम योगदान म्हणून जमा केली जात असते.

Tejas B Shelar
Published:

EPFO Money Rule : तुम्हीही एखाद्या खाजगी कंपनीत काम करता का? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. आज आपण ईपीएफ योजनेची माहिती पाहणार आहोत. ईपीएफ योजना म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 चा ईपीएफ योजना कायदा, 1976 चा ईडीएलआय कायदा अन 1995 च्या पेन्शन योजनेच्या कायद्यांतर्गत कार्य करत असते.

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर एक मोठा निधी मिळत असतो. खरे तर या योजनेत खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या माध्यमातून एक ठराविक रक्कम योगदान म्हणून जमा केली जात असते.

कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातील 12 टक्के रक्कम कर्मचारी आणि 12 टक्के रक्कम कंपनीच्या माध्यमातून या योजनेत जमा होत असते. या जमा झालेल्या रकमेवर मग ईपीएफओ कडून व्याज दिले जात असते. महत्त्वाचे म्हणजे हे व्याजदर सरकारकडून दरवर्षी वाढवले जाते आणि यातून मिळणारे व्याज हे करमुक्त असते.

त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एकरकमी पीएफची रक्कम दिली जात असते, ही रक्कम करमुक्त असते आणि नक्कीच या करमुक्त रकमेमुळे सेवानिवृत्तीनंतरचे कर्मचाऱ्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनते.

कसे मिळणार अडीच कोटी?

जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार 50,000 असेल तर त्याला सेवानिवृत्तीनंतर अडीच कोटी रुपये मिळवण्यासाठी कंपनीत तीस वर्षे काम करणे आवश्यक आहे.

म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 50 हजार रुपये असेल अन त्याने कंपनीत किमान 30 वर्षे काम केलेले असेल आणि त्याने ईपीएफ मध्ये जमा केलेल्या रकमेवर किमान 8.10 टक्के दराने व्याज मिळालेले असेल तर अशा व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर अडीच कोटी रुपये मिळू शकतात. मात्र, सदर कर्मचाऱ्यांचा पगार हा दरवर्षी पाच टक्के दराने वाढायलाही हवा.

ईपीएफओचे काही महत्वाचे नियम

ईपीएफओ सदस्य होण्यासाठी कर्मचारी हा संघटित क्षेत्रातील असावा आणि तो ज्या कंपनीत काम करतोय ती संघटित क्षेत्रातील आणि 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असणारी कंपनी असणे आवश्यक आहे.

कर्मचारी या फंडातून इमर्जन्सी असल्यास मध्येच पैसे काढू शकतात. ईपीएफओ सदस्यांनी जर जुन्या करप्रणालीचा वापर केला तर त्यांना कलम 80C अंतर्गत कर वाचवता येतो. कर्मचाऱ्यांच्या पगारावर लागू होणाऱ्या करात 12 टक्क्यांपर्यंतची बचत करता येते.

मात्र नव्या करप्रणालीमध्ये ही सुविधा नाहीये. तसेच ज्या लोकांचे पीएफ खाते असते अशा लोकांना मोफत विमा सुद्धा मिळतं असतो. एम्पलोयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स अंतर्गत सदर कर्मचाऱ्याला 6 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो.

अर्थातच जर ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला तर मृत्यूच्या पक्षात त्याच्या नॉमिनीला किंवा वारसाला सहा लाख रुपये मिळतात. कंपनीकडून आणि केंद्र सरकारकडून हा लाभ मिळत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe