सोन्याच्या किंमती आणखी वाढणार, भाव लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठणार? किमती वाढण्याचे कारण काय? पहा….

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आगामी काळात किमती आणखी वाढू शकतात असा अंदाज समोर येतोय. तथापि, कधीकधी किंमतींमध्ये घट होते, परंतु सोन्याच्या किमतीत होणारी घट फारच कमी प्रमाणात होते. सोन्याच्या किमती आजच वाढतायेत असे नाही तर कोविड -19 महामारीच्या काळापासून या मौल्यवान धातूच्या किमती वाढत आहेत.

Tejas B Shelar
Published:

Gold Price Breaking : सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. येत्या काही दिवसांनी देशात सणासुदीचा देखील हंगाम सुरू होईल आणि यामुळे सोन्याच्या मागणीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. एकीकडे सोन्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे सोन खरेदी करणाऱ्यांना आता खरेदीसाठी अधिकचा पैसा मोजावा लागत आहे.

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आगामी काळात किमती आणखी वाढू शकतात असा अंदाज समोर येतोय. तथापि, कधीकधी किंमतींमध्ये घट होते, परंतु सोन्याच्या किमतीत होणारी घट फारच कमी प्रमाणात होते.

सोन्याच्या किमती आजच वाढतायेत असे नाही तर कोविड -19 महामारीच्या काळापासून या मौल्यवान धातूच्या किमती वाढत आहेत. सोन्याची किंमती कोरोना महामारीच्या काळापासून आत्तापर्यंत 10-12 हजार रुपयांनी वाढली आहे.

दरम्यान सद्य परिस्थिती पाहता नजीकच्या भविष्यात सोन्याची किंमत एक लाख रुपयाचा टप्पा गाठणार की काय? अशा चर्चा सध्या मार्केटमध्ये सुरू आहेत. अशा परिस्थितीत आज आपण सोन्याची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात का वाढत आहे, याची कारणे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण

सोन्याच्या आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे ज्यांनी कोरोना महामारीच्या आधी सोन्याची खरेदी केली होती त्यांना चांगला लाभ मिळाला आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या भाववाढीचा फायदा मिळतोय.

पण या किमती का वाढत आहेत? जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे, या मौल्यवान धातूच्या किंमतीच्या वाढीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय कारणे जबाबदार आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अन आर्थिक महासत्ता अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडावर लावलेले टॅरिफ यांसारख्या कारणांमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत.

सोन्याच्या किमती एका लाखाला टच करणार?

कोरोनापासून सुरू असणारी सोन्याच्या वाढ अजूनही सुरुचं आहे. म्हणून जर या परिस्थितीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही तर सोन्याची किंमत एक लाख रुपयांची पातळी ओलांडू शकते. पण, या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिक सोन्याच्या खरेदीपासून दूर जात आहेत.

जगातील बहुतांशी देश सोन्याची खरेदी करतात आणि त्या आधारावर चलन छापतात. दरम्यान आता भविष्यात सोन्याच्या किमती किती वाढतात हे सर्वस्वी भविष्यात सोन्यावर लावले जाणारे टैरिफ अन यावर लोकांची प्रतिक्रिया याच मुद्द्यांवर अवलंबून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe