Stock To Buy : आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी काही स्टॉक फोकस मध्ये राहणार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी आज काही स्टॉक फोकस मध्ये राहतील. खरंतर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मात्र या चढउताराच्या काळात स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून आज काही इंट्राडे स्टॉकची शिफारस करण्यात आली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक शेअर मार्केट तज्ज्ञ सुमित बगाडिया, एसएस वेल्थस्ट्रीटचे संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट्स अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज 12 फेब्रुवारीसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे.
![Stock To Buy](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Stock-To-Buy-3.jpeg)
दरम्यान आज आपण या स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुचवलेले ते चार स्टॉक कोणते आहेत? याचीच थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टॉक मार्केट विश्लेषकांनी सुचवलेले इंट्राडे स्टॉक
IFCI : सुगंधा सचदेवा यांनी IFCI या स्टॉकला 49.30 रुपयांना विकण्याचा सल्ला दिलाय. त्याचे लक्ष्य Rs 47 आणि स्टॉप लॉस Rs 50.50 वर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
PNB : अंशुल जैन यांनी PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक 95 रुपयांवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, यासाठीची टार्गेट प्राईस 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि स्टॉप लॉस 93 रुपयांचा लावावा असा सल्ला देण्यात आला आहे.
श्रीराम न्यूज प्रिंट : सुमित बगडिया यांनी श्रीराम न्यूज प्रिंट 20.28 रुपयांवर खरेदी करण्याचा आणि यासाठी 21.80 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. स्टॉप लॉस 19.50 वर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मेडिको रेमिडीज : सुमित बगडिया यांनी हा स्टॉक इंट्राडे साठी 69.93 वर खरेदी करण्याचा आणि यासाठी 75 रुपयांचे टार्गेट प्राईज देण्यात आले आहे. तसेच या स्टॉक साठी 67.50 रुपयांचा स्टॉप लॉस लावावा असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.