IPO GMP | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरचे आणि डिव्हीडंट ची सुद्धा घोषणा करत आहेत. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांमध्ये काही कंपन्यांचे आयपीओ सुद्धा आले आहेत. दरम्यान जर तुमचाही आयपीओमध्ये पैसा ओतण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
हेक्सॉवर टेक्नॉलॉजीज आयपीओ आजपासून म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 पासून सबस्क्रीप्शन साठी खुला होणार आहे. यामुळे ज्यांना या आयपीओ मध्ये पैसा गुंतवायचा असेल त्यांना आता यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
![IPO GMP](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/IPO-GMP-1.jpeg)
इच्छुक गुंतवणूकदार शुक्रवारपर्यंत म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत बोली लावू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. या ईश्यूमधून कंपनीला जवळपास 8,750 कोटी रुपये जमवायचे आहेत, हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे.
याचा अर्थ असा की या इशू मधून जी रक्कम मिळेल ती कंपनीला मिळणार नाही. हेक्साव्हियर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने यापूर्वी अँकर बिडिंगद्वारे 2,598 कोटी रुपये जमवले आहेत. आता आपण या ipo ची संपूर्ण बेसिक डिटेल आणि यामध्ये पैसा लावावा की नाही याची माहिती जाणून घेऊयात.
प्राईस बँड आणि लॉट साईज
कंपनीने आयपीओचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर्स 674 ते 708 रुपये सेट केला आहे. याचा लॉट साईज 21 शेअर्सचा आहे. याचा अर्थ असा की किरकोळ गुंतवणूकदारांना कमीतकमी 14,868 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.
अलॉटमेंट अन लिस्टिंग कधी
शनिवारी (15 फेब्रुवारी 2025) रोजी कंपनी शेअर वाटप करू शकते. तथापि, शेअर वाटप निश्चित करण्यात कोणत्याही विलंब झाल्यास, पुढील आठवड्यात सोमवारी वाटप प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
यानंतर, पुढच्या आठवड्यात बुधवारी (19 फेब्रुवारी 2025) कंपनी बीएसई आणि एनएसई वर आपले स्थान बनवू शकते. कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या विषयासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.
ग्रे मार्केट प्रीमियम
स्टॉक मार्केट तज्ञांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये हेक्सॉवर टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 2 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत.
सबस्क्राईब करावे की नाही
स्टॉकसबॉक्सच्या संशोधन विश्लेषक अभिषेक पांडे यांनी या ईश्यूला सबस्क्राईब रेटिंग दिली आहे. या व्यतिरिक्त आनंद राठी यांनी सुद्धा या ईश्यूला सबस्क्राईब रेटिंग दिली आहे. ते म्हणाले की गेल्या दशकात हेक्सावायर तंत्रज्ञानाचा व्यवसाय बरीच वाढला आहे. म्हणून यामध्ये गुंतवणूक ग्राहकांसाठी फायद्याची राहू शकते.