भारतीय बाईकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे – Triumph Speed T4 ची किंमत आता आणखी स्वस्त झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी बाजारात लाँच झालेल्या या दमदार बाईकच्या किमतीत ₹18,000 ची घट करण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक आता ₹2 लाखांच्या रेंजमध्ये उपलब्ध झाली आहे, जी स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी उत्तम संधी आहे.
Triumph Speed T4 ची नवीन किंमत आणि तुलनात्मक फायदा

बजाज ऑटोने Triumph Speed T4 ची किंमत ₹2.17 लाख वरून थेट ₹1.99 लाखांपर्यंत कमी केली आहे. यामुळे Triumph Speed 400 आणि इतर प्रतिस्पर्धी बाईक्सच्या तुलनेत ही बाईक आणखी किफायतशीर पर्याय ठरू शकते. Triumph Speed 400 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत ₹2.40 लाखांपासून सुरू होते, त्यामुळे आता Speed T4 आणि Speed 400 च्या किंमतीत सुमारे ₹40,000 चा मोठा फरक झाला आहे. याचा अर्थ Speed T4 आता अधिक स्वस्त आणि परवडणारी पर्याय बनली आहे.
इंजिन आणि पॉवर
Triumph Speed T4 मध्ये लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह, DOHC, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 7,000 rpm वर 30.6 bhp ची कमाल पॉवर आणि 5,000 rpm वर 36 Nm टॉर्क निर्माण करते, 6-स्पीड गिअरबॉक्ससह मॅन्युअल थ्रॉटल कंट्रोल आहे. हे तंत्रज्ञान या बाईकला वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्स देते, ज्यामुळे ती शहरी तसेच लांब पल्ल्याच्या राईडसाठी परफेक्ट पर्याय बनते.
आधुनिक तंत्रज्ञान
Triumph Speed T4 ही केवळ स्पीड आणि पॉवरसाठीच नव्हे, तर तिच्या आधुनिक फीचर्ससाठीही प्रसिद्ध आहे. या बाईकच्या सुरक्षिततेसाठी समोर आणि मागे डिस्क ब्रेकसह अँटी-लॉक ब्रेकींग सिस्टम (ABS) देण्यात आले आहे. समोर 4-पिस्टन रेडियल कॅलिपर आणि मागच्या बाजूस फ्लोटिंग कॅलिपर डिस्क ब्रेक आहे, जो वेगवान रायडिंगसाठी आवश्यक असलेला ब्रेकींग परफॉर्मन्स प्रदान करतो. बाईकचा व्हीलबेस 1406 मिमी असल्याने ती स्थिर आणि नियंत्रणक्षम आहे. यात इंटिग्रेटेड मल्टी-फंक्शन एलसीडी स्क्रीनसह अॅनालॉग स्पीडोमीटर आहे, जो रायडरला स्पीड, इंधन स्तर, ट्रिप आणि इतर आवश्यक गोष्टी सहज पाहता येतील.
Triumph Speed T4 का खरेदी करावी ?
जर तुम्हाला दमदार स्पोर्ट्स बाईक हवी असेल, परंतु Triumph Speed 400 च्या तुलनेत थोडी कमी किंमतीत उत्तम परफॉर्मन्स असलेली बाईक पाहत असाल, तर Triumph Speed T4 ही सर्वोत्तम निवड ठरू शकते. यामध्ये तुम्हाला सर्व आधुनिक तंत्रज्ञान, सेफ्टी फीचर्स आणि Triumph ब्रँडची विश्वसनीयता मिळते. ₹2 लाखांच्या रेंजमध्ये उपलब्ध असलेली ही बाईक स्पीड, लूक आणि बजेट याचा उत्तम ताळमेळ साधणारी आहे.