सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्या ! 17 फेब्रुवारीला सोन्याला काय दर मिळाला, महाराष्ट्रात कशी आहे परिस्थिती ?

सोन्याच्या दराने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला असून, लग्नसराईच्या हंगामात किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 400 ची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सामान्य खरेदीदारांसाठी सोने विकत घेणे अधिक कठीण झाले आहे.

Published on -

Gold Price Today : सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. सोन्याच्या किमती अगदीच विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज 17 फेब्रुवारीला देखील सोन्याच्या किमती वाढल्या असून जर तुम्हीही सराफा बाजारात सोने खरेदीसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

खरेतर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला असून, लग्नसराईच्या हंगामात किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 400 ची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सामान्य खरेदीदारांसाठी सोने विकत घेणे अधिक कठीण झाले आहे.

वायदे बाजारात सोन्याचा दर नवा उच्चांक गाठतोय

MCX वर फेब्रुवारी वायदा सोन्याचा दर ₹८५,००६ वर पोहोचला असून, मागील सत्राच्या तुलनेत ₹४१३ ची वाढ झाली आहे. मागील आठवड्यातही सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून आले होते, मात्र अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

चांदीही गगनाला भिडली

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीतही झपाट्याने वाढ झाली आहे. आज चांदीच्या किमतीने तब्बल 1 लाख 500 रुपये प्रति किलो हा विक्रमी टप्पा गाठला आहे. त्यामुळे चांदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर आज 86,620 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 79,400 प्रति 10 ग्रॅम आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरातील सोन्याच्या किमती

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

पुणे : सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,400 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके नमूद करण्यात आली आहे.

सोन्याच्या दरवाढीचे कारण काय?

विशेषज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, तसेच मध्यपूर्वेतील तणाव यामुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. याशिवाय, लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, त्यामुळेही दर वाढले आहेत.

पुढे काय होणार?

विश्लेषकांचे मत आहे की, येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हा योग्य काळ ठरू शकतो, पण नवीन खरेदीदारांसाठी वाढलेले दर आव्हानात्मक ठरू शकतात. मात्र कुठेही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe