भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. हॅरियर, सफारी आणि पंच यासारख्या लोकप्रिय कार्सनंतर आता कंपनी आपली प्रतिष्ठित SUV टाटा सिएरा (Tata Sierra) नव्या स्वरूपात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. २०२४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे संकल्पचित्र (कॉनसेप्ट) सादर करण्यात आले होते, आणि आता तिच्या टेस्टिंगला सुरुवात झाली आहे.
ही कार भारतीय बाजारात लाँच होण्याच्या अंतिम टप्प्यात असून पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक (EV) तिन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे ही टाटाच्या Gen2 EV प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे, ज्यामुळे तिच्या इलेक्ट्रिक वर्जनमध्ये जास्त रेंज आणि परफॉर्मन्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन सिएरा SUV स्पोर्टी आणि आकर्षक लुकमध्ये येणार असून, तिच्या लाँचिंग, किंमती आणि फिचर्सबद्दल सर्व माहिती आपण आज जाणून घेऊया.

नवीन टाटा सिएरा लाँचिंग
टाटा मोटर्सकडून सिएरा SUV 2025 च्या अखेरीस अधिकृतपणे भारतीय बाजारात सादर केली जाण्याची शक्यता आहे. ग्लोबल ऑटो शोमध्ये सादर झाल्यानंतर ही कार भारतीय ग्राहकांसाठी किती आकर्षक ठरणार यावर चर्चा सुरू झाली होती. सिएरामध्ये अत्याधुनिक आणि प्रीमियम फीचर्सचा समावेश असणार आहे, ज्यामुळे ती बाजारातील इतर SUV मॉडेल्ससाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या SUV मध्ये प्रीमियम साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्ट, तसेच व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखी फीचर्स मिळणार आहेत. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक आणि आधुनिक होणार आहे.
सेफ्टी फीचर्स
टाटा मोटर्स नेहमीच आपल्या गाड्यांसाठी उच्च दर्जाच्या सेफ्टी फीचर्ससाठी ओळखली जाते. नवीन टाटा सिएरामध्ये सर्वोच्च सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. या SUV मध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), लेव्हल 2 ADAS (Advanced Driver Assistance System) आणि इतर अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील. याशिवाय, या गाडीच्या इंटिरियरमध्ये तीन स्क्रीन्स दिल्या जाणार आहेत – डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल टचस्क्रीन आणि पॅसेंजर साइड टचस्क्रीन. यात १२.३-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल, जो कारच्या कनेक्टिव्हिटी आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
टाटा सिएरा व्हेरिएंट्स आणि इंजिन
नवीन टाटा सिएरा तिन्ही प्रकारांमध्ये लाँच होणार आहे – पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक (EV).
पेट्रोल व्हेरिएंट: 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन, 170hp पॉवर आणि 280Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता.
डिझेल व्हेरिएंट: 2.0-लिटर इंजिन (हेच इंजिन टाटा हॅरियर आणि सफारी SUV मध्ये वापरण्यात आले आहे).
इलेक्ट्रिक व्हेरिएंट (EV): 60-80 किलोवॅट प्रति तास (kWh) क्षमतेचा बॅटरी पॅक, 500 किमीपेक्षा अधिक रेंज मिळण्याची शक्यता.
याशिवाय, ही SUV AWD (All-Wheel Drive) टेक्नॉलॉजीसह सादर केली जाणार आहे, त्यामुळे ती ऑफ-रोडिंगसाठी देखील उत्तम पर्याय ठरणार आहे. 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.
टाटा सिएराची किंमत
भारतीय बाजारात नवीन टाटा सिएराची किंमत १०.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. टॉप मॉडेल्सची किंमत २० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही SUV लाँच झाल्यानंतर ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा स्कॉर्पिओ, टोयोटा हायराइडर आणि किआ सेल्टॉस यांसारख्या SUV मॉडेल्सना मोठी स्पर्धा देऊ शकते. टाटा मोटर्सच्या नव्या सिएरा SUV मुळे भारतीय SUV सेगमेंटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी मागणी वाढत असताना सिएरा EV पर्याय SUV प्रेमींसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या कारची टेस्टिंग सध्या वेगात सुरू असून, लाँचिंगपूर्वी आणखी काही अपडेट्स समोर येऊ शकतात.