Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. एक जानेवारी 2024 पासून ते आत्तापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मात्र असे असले तरी भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला जबरदस्त परतावा दिला आहे. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये करोडपती बनवले.

आम्ही ज्या मल्टीबॅगर स्टॉक बाबत बोलत आहोत तो स्टॉक आहे इंडो-थाई सेक्युरिटीज लिमिटेडचा. या स्टॉक नाही गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे एका लाखाचे एक कोटी रुपये बनवले आहेत.
हा स्टॉक गेल्या पाच वर्षांपूर्वी फक्त 13.40 रुपयांवर ट्रेड करत होता मात्र आता हा स्टॉक दोन हजार रुपयांवर पोहोचला आहे. या पाच वर्षांच्या काळात सदर स्टोकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 14,825 टक्क्यांनी रिटर्न दिले आहेत. दरम्यान आता आपण या स्टॉकची संपूर्ण डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे शेअर्सची डिटेल?
या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये 14,825% उत्तम परतावा दिला असून एक गुंतवणूकदार ज्याने पाच वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असतील आणि ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असेल त्याची ही गुंतवणूक आता 1.49 कोटीपर्यंत वाढली असेल.
याशिवाय, या स्टॉकने CY21 मध्ये 1,205% आणि CY22 मध्ये 456% मजबूत परतावा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, शेअर बाजारात सध्या प्रचंड घसरण होत आहे मात्र या घसरणीच्या काळात सुद्धा हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहे.
चालू वर्षात हा स्टॉक आधीच 53% ने वाढला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा देत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपनीने 80.46% मंथली प्रॉफिट नोंदवला अन त्यानंतर ऑगस्टमध्ये यात 55.51% वाढ झाली.
1995 मध्ये स्थापित झालेली इंडो थाई लिमिटेड ही कंपनी भारतातील आघाडीची NSE-BSE पूर्ण-सेवा ब्रोकर आहे. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,200 कोटी इतके आहे.