PNB Home Loan : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून अलीकडेच या बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय. या बँकेने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत होम लोनच्या व्याजदरात 0.25% ची कपात केली आहे. आरबीआयने 7 फेब्रुवारीला रेपो रेटमध्ये कपात केली. पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली.
यावेळी आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केलेत. आधी आरबीआयचे रेपो रेट 6.50% इतके होते, मात्र आता हे रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

दरम्यान आरबीआयचे रेपो रेट कमी झाल्यानंतर बँकांच्या व्याजदरात घसरण होण्याची शक्यता होती आणि यानुसार आता विविध बँकांच्या माध्यमातून आपल्या व्याजदरात कपात करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने देखील आपले होम लोन वरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. यामुळे जर तुम्हालाही पंजाब नॅशनल बँकेकडून होम लोन घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान आता आपण पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असल्यास मासिक पगार किती असायला हवा, चाळीस लाखांचे कर्ज घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार, पीएनबीचे सध्याचे होम लोन वरील व्याजदर कसे आहेत ? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा आजच्या या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएनबी बँकेचे सध्याचे व्याजदर कसे आहेत
पंजाब नॅशनल बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बँकेकडून ग्राहकांना किमान 8.25 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र हा बँकेचा किमान व्याजदर असून या व्याजदरात फक्त अशाच लोकांना कर्ज मंजूर होणार आहे ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा 800 च्या आसपास आहे.
40 लाखांचे होम लोन हवे असल्यास किती पगार असावा?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेकडून जर ग्राहकांना 40 लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असेल तर त्यांचा महिन्याचा पगार हा किमान 55 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
सोबतच अशा व्यक्तीवर आधीपासूनच कोणतेही कर्ज नसावे. म्हणजेच जर तुमच्या डोक्यावर कर्ज नसेल आणि तुम्हाला महिन्याला 55 हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला पीएनबी कडून 40 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन मिळू शकतं.
40 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा ईएमआय?
पीएनबीकडून जर एखाद्या ग्राहकाला 8.25% व्याजदरात 40 लाख रुपयांचे गृह कर्ज 30 वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा व्यक्तीला 30 हजार 51 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. लोन रिपेमेंट कालावधीमध्ये सदर ग्राहकाला जवळपास 68 लाख 18 हजार रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.