Small Business Idea In Marathi : छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न अनेकांचे असते. पण व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातील पहिली सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल आणि दुसरी अडचण म्हणजे कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर तो व्यवसाय चांगला चालणार का? तर मित्रांनो आज आपण अशा एका बिझनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत जो की कमी भांडवलात सुरू होतो आणि या व्यवसायातून व्यवसायिकांना चांगली कमाई सुद्धा करता येणार आहे.
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे टी-शर्ट प्रिंटिंगचा आणि हा व्यवसाय फक्त 60 ते 70 हजार रुपयांच्या खर्चात सहजतेने सुरू करता येतो. महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 ते 70 हजार रुपयांचे भांडवल नसेल तर तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता.

दरम्यान आता आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागा लागणार, यासाठी किती भांडवल लागणार, कोणकोणते मशीन्स लागणार आणि यातून कमाई किती होणार? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.
व्यवसायासाठी किती जागा लागणार?
खरं पाहता या व्यवसायासाठी फारशी जागा लागत नाही, तुम्ही तुमच्या राहत्या घरातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी किमान 100 ते 150 स्क्वेअर फुट जागा लागते.
तुमच्या घरात शंभर ते दीडशे स्क्वेअर फूटची रिकामी जागा असेल तर तुम्ही हा व्यवसाय घरातूनच सुरू करू शकता. किंवा मग भाडेतत्त्वावर एखादा गाळा घेऊन सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येतो. मात्र तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी अशा ठिकाणी गाळा घेतला पाहिजे जिथे लोकांना सहजतेने पोहोचता येईल.
तुम्ही जर गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करणार असाल तर बाजारपेठेत गाळा घ्या जेणेकरून तुम्हाला ग्राहकांसोबत जलद गतीने कॉन्टॅक्ट बनवता येईल आणि ग्राहक सहजतेने तुमच्या दुकानात येतील.
किती गुंतवणूक करावी लागणार?
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला प्लेन टी-शर्ट, टी-शर्ट प्रिंटिंग साठी प्रिंटिंग मशीन आणि प्रिंटिंग साठी चे इतर महत्त्वाच्या गोष्टी अरेंज कराव्या लागणार आहेत. या बिझनेस साठी तुम्हाला 15 ते 40 हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असणारे हीट प्रिंटिंग मशीन, प्लेन टी-शर्ट जे की प्रति नग शंभर ते दोनशे रुपयांना मिळतात ते खरेदी करावे लागणार आहेत.
या व्यतिरिक्त, आपल्याला डिझाइन सॉफ्टवेअरची देखील आवश्यकता असेल, ज्यासाठी आपल्याला सुमारे 2,000- 5,000 रुपये खर्च करावे लागतील. टी-शर्ट प्रिंटिंग करण्यासाठी तुम्हाला इंक म्हणजे शाई लागेल.
यासाठी जवळपास तीन हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. यासाठी ट्रान्सफर प्रिंटिंग पेपर सुद्धा लागेल, ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही टी -शर्टवर मुद्रित करू शकता. यासाठी, आपल्याला 1000-5,000 रुपयापर्यंत खर्च करावा लागेल.
आपल्याला पॅकेजिंग सामग्रीवर 2,000- 5,000 रुपयांचा खर्च करावा लागेल. अशाप्रकारे, सुरुवातीला, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला 60-70 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एकदा एवढी गुंतवणूक केली की नंतर मग तुम्हाला फक्त प्लेन टी-शर्टवर आणि इंकसाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
किती कमाई होणार
एक प्रिंटेड टी-शर्ट तयार करण्यासाठी साधारणता तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयांचा खर्च करावा लागणार आहे आणि प्रिंटेड टी-शर्ट सध्या बाजारात 400 ते 600 रुपयांपर्यंत विकले जात आहेत.
म्हणजेच एका टी-शर्ट मागे तुम्ही सहजतेने 200 ते 300 रुपयांची कमाई करू शकता. अशा तऱ्हेने जर तुम्ही एका महिन्यात 1000 प्रिंटेड टी-शर्ट विकण्यात यशस्वी ठरला तर तुम्हाला महिन्याकाठी दोन ते तीन लाख रुपये सहजतेने कमावता येऊ शकतात.