1 लाख रुपये गुंतवणुकीवर मिळाला 4.45 कोटींचा रिटर्न ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

शेअर बाजारातील गुंतवणूकदार नेहमीच मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असतात. लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न देणारे स्टॉक गुंतवणूकदारांना करोडपती बनवतात. Tanfac Industries कंपनीचा स्टॉक देखील असाच एक मल्टिबॅगर स्टॉक आहे. या स्टॉकची किंमत गेल्या अकरा वर्षांमध्ये 445 पटीने वाढली आहे.

Published on -

Multibagger Stock : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण, जर गुंतवणूकदारांनी योग्य कंपनीत लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना फायदा होत असतो.

म्हणूनच शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात देखील काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहे. Tanfac Industries चा स्टॉक देखील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिला असून गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत.

या कंपनीच्या स्टॉकमध्ये अकरा वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी एक लाख रुपये गुंतवणूक केली होती आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली होती त्यांची ही गुंतवणूक आता 4.45 कोटी रुपयांची झाली आहे. आता आपण Tanfac Industries च्या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tanfac Industries स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा

Tanfac Industries स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अकरा वर्षांच्या काळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारी 2014 रोजी Tanfac इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत प्रति शेअर 8 रुपये होती. पण गेल्या आठवड्यात हा स्टॉक 3566 रुपयांवर पोहचलाय. म्हणजेच हा स्टॉक या अकरा वर्षांच्या काळात 445 पटीने वाढला आहे.

यामुळे फेब्रुवारी 2014 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या आणि आत्तापर्यंत ही गुंतवणूक तशीच होल्ड ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 4.45 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.

5 वर्षात किती परतावा दिला

या कंपनीने गेल्या 11 वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक 445 पटीने वाढवली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षातील कंपनीची कामगिरी सुद्धा विशेष उल्लेखनीय राहिली आहे.

मागील पाच वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2900% रिटर्न दिले आहेत. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 80% परतावा दिला आहे.

तसेच गेल्या सहा महिन्यात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 50% रिटर्न दिले आहेत. एक जानेवारी 2025 पासून ते आत्तापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 16% इतका परतावा दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 2930 रुपयांवरून 3566 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ असा की, शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असतानाही कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe