गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! ‘ही’ कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर देणार, रेकॉर्ड डेट जवळ येतेय

शेअर बाजारातील आणखी एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. यामुळे सध्या हा स्टॉक फोकस मध्ये आला आहे.

Published on -

Bonus Share 2025 : बोनस शेअर्स ऑफर करणाऱ्या कंपन्यांवर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शेअर बाजारातील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे. म्हणून जर तुम्हालाही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 1 शेअरवर 4 शेअर्स बोनस म्हणून द्यायचा निर्णय घेतला असून यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा ठरवण्यात आली आहे.

या आठवड्यातचं ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. खरे तर जिंदाल वर्ल्ड लिमिटेड ने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण कंपनीच्या या घोषणेची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तसेच या शेअरची शेअर मार्केट मधील सध्याची स्थिती कशी आहे याबाबत हे आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे डिटेल ?

7 जानेवारी 2025 रोजी जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला याबाबत अधिक अपडेट दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्यासह 4 शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी, कंपनीने 28 फेब्रुवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती.

जे या आठवड्यात आहे. अर्थात या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना प्रत्येक शेअरसाठी 4 मोफत शेअर्स मिळतील. खरंतर सध्या शेअर मार्केट मधील अनेक कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर दिले जात आहेत.

सोबतच काही कंपन्या डिविडेंट सुद्धा देत आहेत. अशातच आता जिंदाल वर्ल्डवाईड लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस देण्याची घोषणा केली असून यामुळे सध्या या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आलाय.

कंपनीने आधी लाभांश दिलाय

ही कंपनी प्रथमच बोनस शेअर्स देणार असली तरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंड म्हणजेच लाभांश देत आहे. 2021 मध्ये कंपनीने एका शेअरवर 15 पैसे लाभांश दिला होता. त्याच वेळी, कंपनीने 2022 मध्ये प्रत्येक शेअरवर 10 पैसे, 2023 मध्ये 20 पैसे आणि 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर 20 पैसे पात्र गुंतवणूकदारांना लाभांश म्हणून दिले होते.

शेअर बाजारातील परिस्थिती कशी ?

या स्टॉकच्या कामगिरीबाबत बोलायचं झालं तर गेली काही वर्षे या कंपनीसाठी चांगली राहिलेली नाहीत. शेअर बाजारात ही कंपनी संघर्ष करताना दिसत आहे. तथापि गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीचे स्टॉक 16 टक्के आणि गेल्या तीन वर्षांमध्ये 25 टक्के इतके वाढले आहेत.

मात्र गेल्या 12 महिन्यांमध्ये या कंपनीचा स्टॉक 5.71 टक्क्यांनी घसरला आहे. या कंपनीची 52 आठवड्याचा उच्चांक 470.95 रुपये आहे आणि 52 आठवड्याचा नीचांक 271.30 रुपये इतके आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपबाबत बोलायचं झालं तर सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 7000 कोटी रुपये इतके आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe