Home Loan Interest Rate : पब्लिक सेक्टरमधील आणखी एका बँकेने आपल्या ग्राहकांसाठी होम लोन सहित विविध कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया ने होम लोन वरील व्याजदर कमी केले होते. दरम्यान आता एसबीआयनंतर देशातील आणखी एका बड्या बँकेने ग्राहकांना भेट दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र अर्थातच बीओएमने आपल्या ग्राहकांना नुकताच मोठा दिलासा दिला आहे आणि गृह कर्ज, कार कर्ज आणि इतर अनेक कर्जाचा व्याज दर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयने सात फेब्रुवारी 2025 रोजी एक मोठा निर्णय घेतला. मध्यवर्ती बँकेने सात फेब्रुवारीला पाच वर्षानंतर पहिल्यांदाच रेपो दरात कपात केली, यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्रने देखील रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेट मध्ये कपात केली आहे.
यामुळे आता बँक ऑफ महाराष्ट्राचे गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच इतर विविध कर्जांचे व्याजदर कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरबीआयने रेपो रेट कितीने कमी केलेत
आरबीआयने दोन वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये बदल केला आहे. आधी रेपो रेट 6.50% इतके होते मात्र यामध्ये 25 बेसिस पॉईंट ने कपात केली. म्हणजेच रेपो रेट 6.25 टक्के इतका झाला. विशेष म्हणजे ही कपात पाच वर्षानंतर पहिल्यांदाच झाली आहे.
याचा परिणाम म्हणून देशातील विविध बँकांच्या माध्यमातून आता कर्जाचे व्याजदर घटवले जात आहेत. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने आज 23 फेब्रुवारी 2025 रोजी एक अतिशय महत्त्वाचे निवेदन जारी केले.
त्यानुसार आता बँकेचे गृह कर्ज, कार कर्ज, शिक्षण कर्जासह विविध कर्जांचे व्याज दर कमी केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो लिंक लेंडिंग रेट अर्थातच आरएलआर 0.25% कमी केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचे गृह कर्ज किती स्वस्त झाले ?
बँकेच्या कपातीनंतर, गृह कर्जाचा बेंचमार्क दर 8.10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी व्याज दरांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे, वाहन कर्जावरील व्याज दर 8.45 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शिक्षण कर्ज आणि इतर कर्जे देखील स्वस्त झाली आहेत.
बँकेने शिक्षण कर्ज आणि इतर रेपो रेट लिंक्ड कर्ज दर (आरएलआर) देखील 0.25 टक्क्यांनी कमी केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बँकेने आधीच कार लोन आणि होम लोन वरील प्रोसेसिंग फी माफ केली आहे.