२४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एका सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली आहे कि कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पुरुषांना महिलांकडून प्रेम आणि रोमान्स हवा असतो तर महिलांना विशेष करून कम्पॅटिबिलिटी हवी असते.
२७ वर्षांच्या खालील अविवाहित लोकांच्या मते, २७-३० हे वय लग्न करण्यासाठी योग्य वय आहे.पण,वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावरच लग्न केले पाहिजे,अशीही माहिती समोर आली आहे.

जीवनसाथीच्या प्रतिसादकांच्या विचारांवर आधारित असलेली ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ भारतीय अविवाहित लोकांमधल्या नात्यांसंबंधी बदलत्या प्राथमिकतांबद्दल बोलले आहे.या सर्वेक्षणानुसार, २९ टक्के महिलांच्या तुलनेत ४७ टक्के पुरुष जोडीदाराची निवड करण्याच्या वेळी प्रेम आणि रोमान्सच्या शोधात असतात,तर ३९ टक्के महिला कम्पॅटिबिलिटी शोधत असतात.
फक्त ११ टक्के अविवाहित लोक असे असतात कि जे जोडीदाराची निवड करण्याच्या वेळी आर्थिक स्थिरता सर्वात महत्त्वाचा घटक समजतात.यात प्रादेशिक भिन्नता सुद्धा दिसून आली आहे.दिल्ली आणि मुंबई मधील अविवाहित लोकांच्या मते रोमान्सला जास्त महत्त्व आहे,पण बंगळुरू मधील अविवाहित लोकं कम्पॅटिबिलिटी वर जास्त भर देतात.
४० टक्के अविवाहित लोक असे आहेत कि जे योग्य जोडीदार मिळाला तर ते परदेशी सेटल व्हायला सुद्धा तयार असतात.हा बदल पारंपरिक अपेक्षांमधील मोठा बदल आहे.पण ७० टक्के पालकांना असे वाटत असते कि आपल्या मुलांनी लग्न झाल्यावर भारतातच राहायला पाहिजे.
तरी सुद्धा या विचारांमध्ये शहरानुसार बदल होत असतात.मुंबई, पुणे आणि बंगळुरू मधील प्रतिसादकांनी परदेशी जोडीदाराशी लग्न करण्याची तयारी जास्त दाखवली आहे.तर दिल्लीतले अविवाहित असलेले लोकं भारतातच स्थायिक होण्यासाठी इच्छुक असतात.यावर जीवनसाथीचे चीफ बिझनेस ऑफिसर रोहन माथुर म्हणाले,आम्ही भारतीय अविवाहित नातेसंबंधाच्या नियमांना नव्याने आकार देत आहेत.
कम्पॅटिबिलिटी आणि पर्सनल आवडीनिवडीला परंपरेच्या अपेक्षांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत.जीवनसाथीच्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ मध्ये ही बदलती विचारसरणी स्पष्टपणे पाहायला मिळते.यामध्ये प्रेमाचे प्राधान्य वाढत असल्याचे दिसत आहे.
म्हणजेच सामाजाच्या दबावापेक्षा पर्सनल व्हॅल्यूस असलेल्या प्रेमाला प्राथमिकता वाढताना दिसत आहे.एक विश्वासू मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून अर्थपूर्ण नाती जोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी अविवाहित लोकांना सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
माता-पिता आता विश्वासू सल्लागार बनल्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार स्वतः मुला-मुलीकडे आहे.फक्त ४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी निवडणार आहेत.यावरून लग्नाविषयी निर्णय घेण्यासाठी स्वायत्ततेचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
लग्नावर होणारा खर्च समान वाटून घेण्याची अपेक्षा या सर्वेक्षणातून दिसून आली आहे. सुमारे ७२ टक्के अविवाहित लोकांचे असे म्हणणे आहे की,लग्नाचा खर्च दोन्ही जोडीदारांमध्ये समान वाटला गेला पाहिजे.फक्त १७ टक्के अविवाहित लोकांना असे वाटते की, ज्यांना थाटामाटात लग्न करायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःच हा खर्च केला पाहिजे.विचारामधील असलेला हा बदल पालकांना देखील मान्य आहे. एका बाजूच्याच पक्षावर आर्थिक ओझं येण्याच्या पारंपरिक पद्धतीपासून सुटका होण्याचा संदेश यातून मिळतो.