4 लाख रुपयांच्या गुंतवणूकीत सुरू करा ‘हा’ बिजनेस ! दरवर्षी 12 लाखाहून अधिक कमाई होणार

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी बिंदी बनवण्याचा व्यवसाय म्हणजेच टिकली बनवण्याचा व्यवसाय फायद्याचा ठरणार आहे. बिंदीला बाजारात मोठी मागणी असते यामुळे तुम्हाला या व्यवसायातून वार्षिक एक लाख रुपयांची कमाई होईल असा एक अंदाज आहे.

Published on -

Business Idea In Marathi : अनेकांना स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे काही सुचत नाही. दरम्यान जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि कोणता व्यवसाय करावा याबाबत तुम्ही कन्फ्युज असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे.

आज आपण अशा एका बिजनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून व्यवसायिकांना वार्षिक 12 लाखाहून अधिक कमाई करता येणे शक्य होणार आहे. हा व्यवसाय फक्त चार लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होतो आणि यातून दरमहा एक लाखाहून अधिक ची कमाई करता येते.

कोणता आहे तो व्यवसाय

आम्ही ज्या बिजनेस बाबत बोलत आहोत तो आहे बिंदी बनवण्याचा म्हणजेच टिकली बनवण्याचा व्यवसाय. खरं तर भारतात हिंदू महिला कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात.

अलीकडे कुंकू ऐवजी टिकली लावणाऱ्या महिला आपल्याला जास्त दिसतात. मुली देखील कपाळावर टिकली लावतात. वेगवेगळ्या डिझाईनच्या टिकल्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरात तुम्हाला टिकलीचे पाकीट सहजतेने दिसेल.

यावरून आपल्याला हा व्यवसाय सुरू केल्यास किती मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकते याचा अंदाज घेता येतो. त्यामुळे जर तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर टिकली बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार?

टिकली बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणता चार ते सहा लाखांचा खर्च येतो. हा व्यवसाय पंधराशे स्क्वेअर फुट जागेत सुरू करता येऊ शकतो.

तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही भाड्याने जागा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला काही यंत्र सुद्धा खरेदी करावी लागतात. या व्यवसायासाठी साधारणता चार ते सहा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल तर तुम्ही पीएम मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता आणि यातून कर्ज घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

किती कमाई होणार

4 लाखात व्यवसाय सुरू करून तुम्ही वार्षिक 7 लाख 50 उत्पन्न मिळवू शकता. तसेच खर्च वजा करता यातून तुम्हाला जवळपास एक लाख 11 हजार रुपयांपर्यंतचा निवडणुका मिळणार आहे. म्हणजेच या व्यवसायातून तुम्ही वार्षिक 12 लाखाहून अधिक कमाई करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe