Stock To Buy : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. खरे तर शेअर बाजारातील ही घसरण गेल्या वर्षी सुरु झाली. सप्टेंबर 2024 पासून शेअर बाजारात घसरण सुरू झाली ती आजपर्यंत कायम आहे.
सेन्सेक्स 9 टक्क्यांनी घसरला आहे आणि निफ्टी मध्ये देखील दहा टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, टॉप ब्रोकरेज पीएल कॅपिटलच्या माध्यमातून डिसेंबर 2025 पर्यंत भारतीय शेअर बाजारात स्टॅबिलिटी येऊ शकते असा अंदाज देण्यात आला आहे.

डिसेंबर 2025 पर्यंत भारतीय इक्विटी बाजार स्थिर होऊ शकतो. यामुळे आता टॉप ब्रोकरेज ने सांगितल्याप्रमाणे भारतीय इक्विटी बाजार या वर्षाच्या अखेरपर्यंत स्थिर होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे पीएल कॅपिटलने गुंतवणूकदारांसाठी काही असे स्टॉक सुचवले आहेत जे की या घसरणीच्या काळात सुद्धा चांगला रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात. आता आपण पी एल कॅपिटल ने सुचवलेले याच स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत.
घसरणीच्या काळात हे स्टॉक गुंतवणूकदारांना देणार चांगले रिटर्न
ब्रोकरेज फर्मने सध्या भारतीय शेअर बाजारात जी घसरण सुरू आहे ती घसरण विचारात घेऊन गुंतवणूकदारांसाठी असे काही प्रमुख स्टॉक सुचवले आहेत जे की आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची शक्यता आहे.
सदर ब्रोकरेजने आपल्या पोर्टफोलिओमध्ये कर कपात, महागाईत घट आणि रेपो दर कपातीनंतर मागणीत अपेक्षित वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
यामुळे या ब्रोकरेजने Cipla, Astral Poly, Maruti Suzuki, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, ABB, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंटरग्लोब एव्हिएशन, ITC आणि Bharti Airtel हे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले आहेत.
या सोबतच पीएल कॅपिटलने काही स्टॉक साठी देण्यात आलेले आपले आधीचे टार्गेट प्राईस आता कमी केली आहे. एल अँड टी, टायटन, एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एचडीएफसी एएमसी शेअर्समधील टार्गेट कमी करण्यात आले आहे.
खरे तर जागतिक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे काढत आहेत आणि याचाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसतोय आणि यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.