शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News! ‘ही’ कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला 14.5 रुपयांचा लाभांश देणार, रेकॉर्ड डेट फिक्स

Vesuvius India Limited ने आपल्या शेअर होल्डर साठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी 14.5 रुपयांचा लाभांश देणार आहे. कंपनीने यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा सुनिश्चित केली आहे. यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

Published on -

Dividend Stock : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः जे लोक बोनस शेअर आणि डिविडेंड म्हणजे लाभांश देणाऱ्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत अशा लोकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या एका बड्या कंपनीने आपल्या शेअर होल्डर साठी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.

यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले असून शेअर बाजारातील घसरणीच्या काळात सुद्धा या कंपनीने गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. सिरॅमिक कंपनी Vesuvius India Ltd ने बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 रोजी डिसेंबर तिमाहीचे (Q3) निकाल जाहीर केले आहेत.

या निकालासोबतच कंपनीने आपल्या इक्विटी शेअर्सचे विभाजनही जाहीर केले आहे. अर्थात कंपनीकडून स्टॉक स्प्लिट केले जाणार आहेत. एक इक्विटी शेअर, ज्याचे सध्या 10 रुपये फेस वॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आहे, प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या दहा शेअर्समध्ये विभागले जाणार आहेत.

मात्र स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी देखील यासाठीची रेकॉर्ड अजून निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे शेअर विभाजनाची रेकॉर्ड नेमकी काय असणार? याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, Stock Split सोबतच ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश सुद्धा देणार आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला प्रति शेअर 14.5 रुपयांचा लाभांश देणार आहे. विशेष बाब अशी की कंपनीने यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित केलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Vesuvius India Limited ने एक मे 2025 ही तारीख लाभांश देण्यासाठीची रेकॉर्ड डेट ठरवली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर चे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्या शेअर होल्डर्स ला कंपनीकडून लाभांश दिला जाणार आहे.

पात्र शेअर होल्डर्सला प्रति शेअर 14.5 रुपयांचा लाभांश कंपनीकडून मिळणार आहे. दरम्यान या कंपनीचा शेअर मंगळवारी 0.4% वाढून 4,049 रुपयांवर बंद झालेत. पण हा स्टॉक 5,999 च्या विक्रमी उच्चांकावरून 33% घसरला आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत हा स्टॉक 20 टक्क्यांनी घसरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe