6500mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग! Vivo Y39 5G दमदार फीचर्ससह लाँच

Published on -

चायनीज स्मार्टफोन मेकर कंपनी Vivo ने नवीन Vivo Y39 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन आकर्षक डिझाइन, दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह येतो. Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीसह हा फोन अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे. कंपनीच्या मते, हा फोन पॉवर, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणा यांचा परिपूर्ण मेळ साधतो.

डिस्प्ले

Vivo Y39 5G मध्ये 6.68-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1608×720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हा डिस्प्ले गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी उत्तम आहे, कारण तो स्मूथ आणि वेगवान रेस्पॉन्स देतो. फोनचे वजन 205 ग्रॅम आहे आणि त्याचे 165.7 x 76.3 x 8.09 मिमी असे कॉम्पॅक्ट माप आहे, ज्यामुळे तो हाताळायला सोपा वाटतो. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, जो वेगाने फोन अनलॉक करण्यास मदत करतो. याशिवाय, IP64 रेटिंगमुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.

प्रोसेसर आणि स्टोरेज

Vivo Y39 5G मध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर आहे, जो 4nm आर्किटेक्चरवर आधारित आहे. हा प्रोसेसर पॉवर-इफिशियंट असून, दैनंदिन टास्क, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो. फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा, अॅप्स आणि गेम्स सहज साठवता येतात. तसेच, व्हर्च्युअल RAM सपोर्टसह 8GB पर्यंत अतिरिक्त RAM मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे फोनचा वेग अधिक चांगला राहतो.

6500mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग

Vivo Y39 5G ची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 6500mAh ची दमदार बॅटरी. कंपनीच्या मते, हा फोन एकदा चार्ज केल्यावर दिवसभर आरामात चालतो. 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याने हा फोन केवळ 83 मिनिटांत 1% वरून 100% पर्यंत चार्ज होतो. हा फोन Android 15 आधारित Funtouch OS 15 वर चालतो, त्यामुळे वापरकर्त्यांना नवीन सॉफ्टवेअर अनुभव मिळतो.

50MP कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी, Vivo Y39 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चर सह येतो. यामुळे कमी प्रकाशातही स्पष्ट आणि सुंदर फोटो काढता येतात. याशिवाय, फोनमध्ये 2MP बोकेह कॅमेरा आहे, जो पोर्ट्रेट मोडमध्ये उत्तम परिणाम देतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो AI-एनहांसमेंट तंत्रज्ञानासह अधिक चांगल्या दर्जाच्या सेल्फीज काढतो.

कनेक्टिव्हिटी आणि फीचर्स

Vivo Y39 5G मध्ये Wi-Fi, Bluetooth 5.1, NFC सपोर्ट आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे, जो वेगवान डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. फोनमध्ये ड्युअल 5G सपोर्ट आहे, त्यामुळे इंटरनेट स्पीड अधिक वेगवान राहतो.

Vivo Y39 5G ची किंमत

Vivo Y39 5G Ocean Blue आणि Galaxy Purple या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन मलेशियामध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे आणि त्याची किंमत 1,099 मलेशियन रुबल (सुमारे ₹20,000) आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe