PPF Scheme : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे, अन म्हणून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार धजावत नसल्याचे वास्तव आहे.
अनेकांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली असून आता सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान जर तुम्हाला ही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ या सुरक्षित बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. पीपीएफ एक सरकारी योजना असून या गुंतवणुकीच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारकडून चांगले व्याज सुद्धा दिले जात आहे.
आता आपण पीपीएफ योजना नेमकी कशी आहे आणि यामध्ये तीस हजाराची गुंतवणूक करूनहीं कशा पद्धतीने लखपती होता येईल याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे PPF योजना?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक पंधरा वर्षांची सरकारी योजना. अर्थात पंधरा वर्षे हा या योजनेचा लॉक इन पिरेड असून या कालावधीत या योजनेत गुंतवलेली पूर्ण रक्कम काढता येत नाही. यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक पाचशे रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येते.
म्हणजेच गुंतवणूकदार दरवर्षी किमान पाचशे रुपये आणि कमाल तीन लाख रुपये गुंतवू शकतात. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा मिळतो.
महत्त्वाची बाब अशी की ही योजना पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाच-पाच वर्षांसाठी वाढवता येते. पीपीएफ योजना सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार या योजनेला मुदतवाढ देऊन तब्बल पन्नास वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकतो.
हेच कारण आहे की जे लोक सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिता अन लॉन्ग टर्म मध्ये पैसा गुंतवायचा आहे त्यांच्यासाठी पीपीएफ योजना फायद्याची ठरते. या योजनेचं अकाउंट ओपन करायच असेल तर इंडियन पोस्ट अन बँकेत अकाउंट ओपन करता येऊ शकत.
30 हजाराची इन्व्हेस्टमेंट किती रिटर्न देणार?
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ अकाउंट ओपन केले आणि यामध्ये दरवर्षी तीस हजाराची गुंतवणूक सुरू केली तर पंधरा वर्षांनी यामध्ये गुंतवणूकदार चार लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि या गुंतवणुकीवर संबंधित ग्राहकाला 7.10% दराने तीन लाख 63 हजार 642 रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात दरवर्षी तीस हजार रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी वर एकूण आठ लाख 13 हजार 642 रुपये मिळणार आहेत.