Maharashtra New RTO : महाराष्ट्रात आरटीओ वरून त्या-त्या भागाची ओळख होत असते. जसे की आपल्या अहिल्यानगरचा आरटीओ क्रमांक MH 16 आहे अन यावरून अहिल्यानगरची संपूर्ण राज्यात ओळख होते. दरम्यान याच आरटीओ क्रमांकाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. आता राज्यात MH 57 नाही तर MH 58 पर्यंत आरटीओ क्रमांक राहणार आहेत.
कारण की महाराष्ट्रातील एका मोठ्या शहराला आता एमएच 58 हा आरटीओ क्रमांक देण्यात आला आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्रात 1 मार्च हा दिवस परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो.

दरम्यान, परिवहन विभागाच्या माध्यमातून आपल्या स्थापना दिनाचे औचित्य साधून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 28 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर शहराला नवीन आरटीओ क्रमांक देण्यात आला असल्याची मोठी घोषणा केली आहे.
अर्थातच आता मीरा-भाईंदर शहराला नवीन आरटीओ कार्यालय मिळणार आहे आणि या शहरासाठी MH 58 हा नवीन आरटीओ क्रमांक देण्यात आला आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहर व आजूबाजूच्या उपनगरांचा झपाट्याने विकास झाला आहे.
एमएमआर क्षत्रातील होणारा विकास पाहता सरकारकडून सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. मीरा भाईंदर बाबत बोलायचं झालं तर या भागाचा देखील गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे आणि येथील वाहनांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच आहे.
हीच गोष्ट लक्षात घेऊन आता येथील रहिवाशांसाठी गुड न्यूज देण्यात आली आहे. मिरा-भाईंदर शहराला MH 58 नवा आरटीओ क्रमांक क्रमांक मिळाला आहे. तसेच मिरा-भाईंदर शहरासाठी स्वतंत्र कार्यालय देखील असणार आहे.
म्हणजेच आता आगामी काळात या परिसरातील गाड्यांवर तुम्हाला MH 58 हा आरटीओ क्रमांक पाहायला मिळणार आहे. नक्कीच परिवहन विभागाच्या या निर्णयाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून या भागातील नागरिकांनी परिवहन विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मीरा-भाईंदर साठी मंजूर करण्यात आलेले आरटीओ कार्यालय उत्तन येथील रहिवाशांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीवर विकसित केले जाणार आहे. या प्रशस्त कार्यालयामुळे आणि आरटीओ क्रमांकामुळे मीरा-भाईंदरला एक वेगळी ओळख मिळणार आहे.
मीरा-भाईंदरला आता महाराष्ट्रात MH 58 ही एक नवी ओळख मिळणार असून यामुळे मीरा-भाईंदर परिसरातील नागरिकांकडून शासनाच्या निर्णयाचे तोंड भरून कौतुक करण्यात आले आहे.
दरम्यान सरकारने याबाबतचा शासन निर्णय अर्थात जी आर नुकताच निर्गमित केला आहे. 28 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबतचा जीआर निर्गमित झाला आहे.