Top 5 Mutual Fund Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे, यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील या घसरणीचा फटका बसत आहे.
पण असे असले तरी गेल्या पाच वर्षांच्या काळात काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. म्हणून तुम्हीही आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण टॉप 5 म्युच्युअल फंडची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण आहे मात्र लार्ज कॅप म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये जबरदस्त परतावा मिळाला आहे.
हे 5 लार्ज कॅप Mutual Fund ठरणार फायदेशीर
Nippon India Large Cap : हा लार्ज कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी जणू कुबेरचा खजाना ठरला आहे. या म्युच्युअल फंडणे पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 18.94% रिटर्न देण्याची किमया साधली आहे. हेच कारण आहे की हा फंड या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
एबीएसएल फ्रंटलाईन इक्विटी फंड : या यादीत हा म्युच्युअल फंड दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. हा लार्ज कॅप म्युच्युअल फंड गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देतोय. पाच वर्षांच्या काळात या म्युच्युअल फंडने 16.02% रिटर्न दिले आहेत.
बडोदा पीएनबी परिबास लार्ज कॅप : हा म्युच्युअल फंड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या फंडने गेल्या पाच वर्षात 15.55% रिटर्न दिले आहेत.
कॅनरा रोबेको ब्लू चिप इक्विटी फंड : हा म्युच्युअल फंड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या फंडने गेल्या पाच वर्षात 15.58% रिटर्न दिले आहेत.
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यू चीप फंड : हा लार्ज कॅप फंड सुद्धा गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला असून गेल्या पाच वर्षांमध्ये याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लार्ज कॅप फंडने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 15.28% रिटर्न दिले आहेत.