Pune Railway Station : होळीच्या आधीच पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे पुणे आणि अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरे तर, दरवर्षी होळीच्या सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही होळीच्या सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन रेल्वेच्या माध्यमातून पुणे शहरातून काही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
पुणे ते दानापुर दरम्यान देखील रेल्वे विभागाकडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक?
पुणे ते दानापुर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन द्वीसाप्ताहिक राहणार आहे म्हणजेच ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाईल. गाडी क्रमांक 01481 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. 10 मार्च, 14 मार्च आणि 17 मार्च रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 7:55 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि ही गाडी दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पोहोचणार आहे.
एकूणच या विशेष गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. दुसरीकडे गाडी क्रमांक ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन 12 मार्च, 16 मार्च आणि 19 मार्च रोजी दानापूर येथून सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी ही गाडी पुण्यात पोहोचणार आहे.
अर्थातच या देखील गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. म्हणजे पुणे ते दानापूर अशा तीन फेऱ्या आणि दानापूर ते पुणे अशा तीन फेऱ्या म्हणजे या विशेष ट्रेनच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी या मार्गावरील तब्बल 18 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड,
जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.