एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवत आहेत. दरम्यान जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. कारण की, आज आपण एसबीआयच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

SBI 2 Years FD Scheme : शेअर मार्केट मध्ये सध्या मोठा दबाव पाहायला मिळत आहे. या दबावामुळे अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करताना दिसत आहे. यामुळे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवत आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. दरम्यान जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे.

कारण की, आज आपण एसबीआयच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीची एफडी योजना ऑफर करते.

यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर ऑफर केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर 3.50% पासून ते 7.25% दराने व्याज दिले जात आहे.

एसबीआय बँक दोन वर्षांची म्हणजेच 24 महिने कालावधीची एफडी योजना सुद्धा ऑफर करते. या एफडीवर बँकेकडून सामान्य ग्राहकांना सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच ज्या ग्राहकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्या ग्राहकांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.

आता आपण एसबीआयच्या याच एफडी योजनेत म्हणजे 24 महिन्यांच्या एफ डी योजनेत चार लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याबाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.

4 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेमध्ये एखाद्या सामान्य ग्राहकाने जर चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला सात टक्के दराने चार लाख 59,552 मिळणार आहेत. अर्थात दोन वर्षात सामान्य ग्राहकांना 59 हजार 552 व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

तसेच जर एखाद्या 60 वर्षांवरील नागरिकांनी म्हणजे सिनिअर सिटीजन ग्राहकाने या एफडी योजनेत 4 लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच 24 महिन्यानंतर 4 लाख 64 हजार 88 रुपये मिळणार आहेत, अर्थातच 64,088 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe